Sunday, May 5, 2024
HomeNewsमध्यप्रदेशमध्ये ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या; १४ ठार, ५० जखमी

मध्यप्रदेशमध्ये ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या; १४ ठार, ५० जखमी

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. मोहनिया बोगद्याजवळ ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या.या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ५० जण जखमी झाले असून यातील १५-२० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. यानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोहनिया बोगद्याजवळील बरोखर गावाजवळ हा अपघात झाला. बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर तीन बस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या सिमेंटने भरलेल्या ट्रकचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसला धडकला. यात दोन बस उलटल्या, तर तिसरी बस चक्काचूर झाली. या अपघातात ५ जण ठार झाले तर ५० जण जखमी झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय