Thursday, April 25, 2024
HomeNewsमाणुसकीचे दर्शन,चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून "इतक्या "कोटी रुपयांची मदत

माणुसकीचे दर्शन,चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून “इतक्या “कोटी रुपयांची मदत

जगात अद्याप माणुसकी संपलेली नाही. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. एका लहान बाळाच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपयांची मदत एका अज्ञाताने दिली. त्यामुळे या बाळाचा जीव वाचणार आहे.मुंबईत वास्तव्याला असणारे पण मूळ केरळचे असणारे दाम्पत्य सारंग मेनन आणि आदिती याचा चिमुकला निर्वाण (1.5 वर्षे). (Nirvan Sarang) त्याला दुर्मिळ आजार झालाय. त्याच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे. एका अज्ञात व्यक्तीने या दाम्पत्याला मदत करताना तब्बल 11 कोटी रुपये दिलेत.

निर्वाण (Nirvan Sarang) याला दुर्मिळ आजार जडलाय. त्याच्यावर उपचार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे. निर्वाण याच्या जीन रिप्लेसमेंट उपचारांसाठी लागणाऱ्या ‘झोल्जेन्स्मा’ या औषधाच्या एका डोसची किंमत 17.5 कोटी रुपये आहे. इतकी मोठी रक्कम उभी करणे त्याच्या आई-वडिलांना शक्य नाही. मात्र, अज्ञात दानशूर व्यक्ती आणि इतरांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे ही रक्कम जमा झाली आहे. आता औषध अमेरिकेतून मागविण्यात येणार आहे.

निर्वाणला ‘एसएमए टाइप 2’ हा आजार झालाय. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर 7 जानेवारी रोजी आजाराचे निदान झाले. या आजारावरील उपचारांसाठी मोठा खर्च येणार असे समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अतिशय महागड्या औषधांपैकी एक ‘झोल्जेन्स्मा’. हे औषध अमेरिकेतून मागविण्यासाठी सारंग यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाशी संपर्क साधला. हे औषध मिळण्यास 20 दिवस लागतील.

आपल्या लहानग्या मुलाच्या मदतीसाठी मदत मिळाल्यानंतर सारंग मेनन यांनी सांगितले की, जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. मुलाच्या उपचारांसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भरघोस मदत मिळाली. ही माणसे देवासारखी आमच्या पाठीशी राहिली आहेत. त्यामुळे मला प्रत्यक्षात देवाचे आभार मानाचे आहेत. आजही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन झाले. याची माहिती सारंग यांनी फेसबुकवर एक पोस्टमधून दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय