Monday, March 17, 2025

राज्याचं संभाव्य मंत्रीमंडळ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, बघा कोणाला मिळाले कोणते मंत्रीमंडळ

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रात्री उशीरा शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत मंत्रीमंडळाच्या विस्तार आणि इतर मंत्र्याच्या शपथविधीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे आणि फडणवीस यांच्यात नव्या मंत्री मंडळासाठी चर्चा सुरू असतानाच आता सोशल मिडीयावर राज्यातील नव्या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या मंत्रीमंडळाच्या यादीत एकूण ३० जणांचे कॅबिनेट करण्यात आले आहे. तर ११ जणांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. या सोबतच कोणत्या मंत्र्याला कोणते खाते हे देखील लिहण्यात आले आहे. हे मंत्रीमंडळ सध्या सोशल मीडिसीवर तूफान व्हायरल होत आहे.

1) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री
2) देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री (गृह खाते )

कॅबिनेट मंत्री
३) चंद्रकांत पाटील-महसूल
4) सुधीर मुनगंटीवार – अर्थ व नियोजन
५) दादा भुसे – आरडीडी
६) प्रवीण दरेकर – पीडब्ल्यूडी
7) गुलाबराव पाटील – सिंचन
8) आशिष शेलार – शालेय शिक्षण
९) गिरीश महाजन – मेड एज्यु
10) विखे पाटील – शेती
11) संजय कुटे – आरोग्य
12) अशोक उईके – आदिवासी
13) बबन पाचपुते – अन्न नागरी पुरवठा
14) संभाजी निलंगेकर – उद्योग
15) सुभाष देशमुख – सहकार
16) राम शिंदे – ओबीसी व्हीजेएनटी
17) तानाजी सावंत – ऊर्जा
18) संदीपान भुमरे – जलसंपदा
19) संजय राठोड – वने
20) प्रताप सरनाईक – पर्यावरण
21) शंभूराज देसाई – गृहनिर्माण
22) अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक
23) प्रशांत ठाकूर – मत्स्यपालन
24) किसन कथोरे – FDA
25) आशिष जैस्वाल – वाहतूक
26) सुहासिनी फरांदे – W&CD
27) बबन लोणीकर – पाणी पुरवठा व स्वच्छता
28) चंद्रशेखर बावनकुळे – उत्पादन शुल्क
29) जयकुमार रावल – पर्यटन
३०) उदय सामंत – उच्च तांत्रिक राज्यमंत्री

राज्यमंत्री
1) दिपक केसरकर – महसूल
२) बच्चू कडू – वाहतूक
3) मोनिका राजले – W&CD
4) अनिल बाबर – सामाजिक न्याय
5) रणधीर सावरकर – UDD
6) राजेंद्र पाटणी – ऊर्जा
7) निलय नाईक – RDD
8) अतुल भातखळकर – गृहनिर्माण
9) लक्ष्मण पवार – शालेय शिक्षण
१०) भरत गोगावले – पर्यटन, एमआरईजीएस मत्स्यपालन आणि फलोत्पादन
11) संजय सिरसाट – पीडब्ल्यूडी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles