Saturday, April 20, 2024
Homeलाइफस्टाइलसोन्याला तेजी तर चांदीत घसरण, वाचा सोन्या-चांदीचे आजचे दर !

सोन्याला तेजी तर चांदीत घसरण, वाचा सोन्या-चांदीचे आजचे दर !

मुंबई, २ जुलै : केंद्र सरकारने (Central Government) सोन्याच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद सराफ बाजारात उमटताना दिसत आहे. शुक्रवारी (१ जुलै) सोन्याचा (Gold Rate) भाव तब्बल १५०० रुपयांनी वाढला आहे. मागील चार महिन्यात एकाच दिवसात सोने दरात झालेली ही मोठी वाढ ठरली.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, आज मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,००० रुपये वाढला आहे. हा दर काल ४७,८५० होता. तर मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,३४० प्रति १० ग्रॅम आहे. हा दर काल ५२,२०० होता. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,०५० आहे. काल ४७,९०० होता. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३९० रुपये आहे, तो काल ५२,२५० होता. सोन्याच्या किंमतीत तेजी असताना चांदीच्या किंमतीत मात्र घसरण बघायाला मिळत आहे. मुंबई मध्ये आज एक किलो चांदीचा दर हा ५७,८०० आहे. हा दर काल ५९,००० होतो. चांदीचे हे दर पुण्यासह काही शहरात सारखे बघायला मिळाले.

सोने खरेदी करणारा भारत हा जगातील दुसरा मोठा ग्राहक आहे. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे. दुसरीकडे रशियानेही G7 देशांच्या सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून, त्याचा परिणाम देखील भारतीय बाजारावरही दिसणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय