Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोनासमाधानकारक: राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार

समाधानकारक: राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार

(प्रतिनिधी):- राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार ०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७ हजार ०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

      तसेच आज राज्यात ६ हजार ३३० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १ लाख ८६ हजार ६२६ अशी झाली आहे. आज नवीन ८ हजार ०१८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ०१ हजार १७२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

तर आता पर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ५३ लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या राज्यात एकूण ७७ हजार २६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय