Saturday, May 4, 2024
Homeकृषीऊस तोडणी व वाहतूक दरवाढीचा नवीन करार तीन वर्षाचाच होणार

ऊस तोडणी व वाहतूक दरवाढीचा नवीन करार तीन वर्षाचाच होणार


मुंंबई (दि.१०) 
: आज येथील साखर संघाच्या कार्यालयात संघाचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने पुकारलेल्या संपाच्या पार्श्र्वभूमीवर साखर संघाच्या वतीने ही बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीत सिटू संलग्न महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी गेल्या वेळी पाच वर्षांचा करार केल्यामुळे कामगारांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत करार तीन वर्षांचा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्यावर बैठकीत सर्वांचे एकमत झालेने नवीन करार तीन वर्षांचा होणार आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर होते, तर बैठकीत उपाध्यक्ष आबासाहेब पाटील व श्रीराम शेटे, पंकजाताई मुंडे, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते.

बैठकीत घोषित कल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करुन कामगारांची नोंदणी करा, तोडणी दर टनाला ४०० रुपये करावे, वाहतूक दरात ५० टक्के वाढ करा, कमिशन २५ टक्के करावे, कोविड सुरक्षिततेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. बैठकीसाठी प्रा. आबासाहेब चौगले व इतर सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

साखर संघाचे संचालक मंडळ व कारखान्याचे प्रतिनिधी यांचे बरोबर विचार विनिमय करून करार करण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन अध्यक्ष दांडेगावकर यांनी दिले, असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय