देशातील क्रांतिकारी लढाऊ कामगार संघटना सीटू मध्ये सामील व्हावे – कॉ.गंगाधर गायकवाड
नांदेड : नमस्कार चौक आणि माता गुजरीजी चौक परिसरातील जभवानी ग्रेनाईट गॅलरी येथे दि.१४ जानेवारी रोजी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली टाईल्स, ग्रेनाईट मिस्त्री व ठेकेदारांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मिस्त्री व ठेकेदार उपस्थित होते.
सदरील मेळाव्यात कमी पडणारा पगार,शासकीय योजनांचा अभाव, लेकरांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न, वाढती महागाई सह विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे सहसचिव कॉ.सं.ना.राठोड, होकर्स युनियनचे अध्यक्ष कॉ. मारोती केंद्रे, मजदूर युनियनचे मो.रफिक पाशा, युनाइटेड ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष सिमॉन नागोरे, प्रेमदास वळसंगकर, प्रेम कांबळे आदींची भाषणे झाली.
शिवाजी कदम, शेख नविद, संजय बिलोलीकर, बालाजी हिरवे सह अनेकांनी चर्चेत सहभागी होऊन गरनाईट कामगारांच्या समस्या मांडल्या.कामगारा प्रति उदासीन असलेल्या सरकारच्या धोरणा विरोधात ग्रेनाईट कामगारांमध्ये असंतोष दिसून आला.
लवकरच युनियन स्थापन करून योग्य पद्धतीने कामगारांची बाजू शासन दरबारी मांडण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल असा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.
जयभवानी गॅलरीचे मालक शंकर पोलमपल्ली व गणेश पोलमपल्ली यांनी यांच्या सहकार्यातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कामगारांना सखोल मार्गदर्शन केले असून देशातील क्रांतिकारी व लढाऊ तसेच सर्वात मोठी कामगार – कर्मचारी संघटना असलेल्या सीटू कामगार संघटनेत सामील व्हावे असे आवाहन केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी माधव गीरी, अमोल लोणे,राजेश कांबळे,गोविंद कदम,उद्धव गीरी,संभाजी हाटकर, शेख जावेद, अशोक राठोडआदींनी परिश्रम घेतले.अशी माहिती ग्रेनाईट मार्बल मिस्त्री प्रेम कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.