जुन्नर : मंथन फाउंडेशन व वाय. आर. जी. केअर यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी एचआयव्ही सह जगणाऱ्या तसेच एचआयव्ही नसलेल्या मुलांसाठी वयोगटातील मुलांसाठी शासकीय मुलींचे वसतिगृह, कल्याण पेठ, येथे कार्यक्रम संपन्न झाला.
आशा भट्ट मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच एचआयव्ही संक्रमित व्यक्तींचे हक्क, अधिकार व जबाबदारी याबद्दल माहिती दिली. त्याच बरोबर या पुढे मुलांना मदत करण्यात येईल असे सांगितले. ॲक्सेलरेट प्रकल्प अंतर्गत शून्य ते १८ वयोगटातील मुलांसाठी मंथन फाउंडेशन सामजिक संस्थेच्या सहकाऱ्याने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांचा, त्यांचे पालक, भावंडं, मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने काम सुरू केले आहे. तसेच समाजातील भेदभाव, एचआयव्ही व्यक्तीकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी संस्था खेड, आंबेगाव व जुन्नर मध्ये कार्यरत आहेत.
कार्यक्रमा दरम्यान मंथन फाउंडेशनच्या अर्चना पवार यांनी पालक व मुलांसाठी खेळ घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी व पालकांनी उत्साहाने सहभागी घेतला.
यावेळी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, मनीषा परदेशी, अर्चना पवार, रोशन गाडेकर, कविता परदेशी, मुग्धा ठाकूरदेसाई, रेखा डाळिंबे, रोहिणी फटांगडे, संगीता मुरादे आदी उपस्थित होते. तर उपक्रम पार पाडण्यासाठी दीपक निकम, डॉ. सुनील पवार, ज्ञानेश कुटे, हनुमंत शिंदे, रंजना कदम, सुनील आमले, सीमा टाकळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.