Tuesday, May 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकोल्हापुरातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळेंच्या भगिनीचे स्वप्न सत्यात उतरले !

कोल्हापुरातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळेंच्या भगिनीचे स्वप्न सत्यात उतरले !

आमदार महेश लांडगे यांनी शिक्षणासाठी मदतीचा धनादेश दिला

पिंपरी चिंचवड : कोल्हापूर येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला दिलेला शब्द अखेर आमदार महेश लांडगे यांनी पूर्ण केला. वीर भगिनी कल्याणी जोंधळे हिच्या घराचे काम पूर्ण झाले. तसेच तिच्या शिक्षणासाठीही धनादेश सूपुर्द करण्यात आला. शहीद ऋषिकेश यांच्या मातोश्री कविता जोंधळे व बहीण कल्याणी जोंधळे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. 

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सौभाग्यवती अरुंधती महाडिक, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उप महाराष्ट्र केसरी राजाराम मगदूम, कामगार नेते रोहिदास गाडे, खंडू भालेकर, देवराम जाधव, राजू बोत्रे, बाळासाहेब गाडे, अनिल लोंढे, सतिश गावडे, सागर हिंगणे, माजी सैनिक नवनाथ मु-हे, प्रमोद सस्ते आदी उपस्थित होते.

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषिकेश जोंधळे वयाच्या २० व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाला. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांना दि.२१ नोव्हेंबर २०२० रोजी वीरमरण आले. जोंधळे कुटुंबाचा आधार असलेला मुलगा देशसेवेसाठी धारातीर्थी पडला.

दरम्यान, सामाजिक बांधिलकीतून आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापूरला रवाना होत शहीद जोंधळे यांची बहीण कल्याणी हिच्याकडून राखी बांधून घेतली. भाऊ- बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आमदार लांडगे यांनी कल्याणीसोबत साजरा केला. त्यावेळी शहीद ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नातील घर उभारण्यासाठी मदत करणार आणि कल्याणी हिच्या शिक्षणासाठी व पुढील आयुष्यात कोणत्याही अडचणीत पाठिशी उभा राहण्याचा शब्द आमदार लांडगे यांनी दिला होता.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राज्य अधिवेशन सातारा येथे उत्साहात संपन्न, नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर

आमदार महेश लांडगे यांचा आदर्श

दरम्यान, शहीद ऋषिकेश यांच्या कुटुंबियांनी घराचे काम पूर्ण केले. या घराच्या वास्तुशांतीसाठी आमदार लांडगे कोल्हापूरला रवाना झाले. शहीद ऋषिकेश यांच्या मातोश्री कविता जोंधळे यांची भेट घेतली. घरासाठी लागलेल्या खर्चाचा धनादेश कल्याणी जोंधळे हिच्या हाती सुपूर्द केला. गतवर्षी,कल्याणी हिला दुचाकी आणि लॅपटॉपही रक्षाबंधन निमित्त भेट दिली होती. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांची बहीण कल्याणी जोंधळे ही इंटेरिअर डिझाईन शाखेची विद्यार्थीनी आहे.पुढील शिक्षणासाठीही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. दिलेला शब्द पूर्ण करीत आमदार लांडगे यांनी आदर्श निर्माण केला आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय