(पुणे) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या परिस्थितीत पोटाची खळगी भरणे मोठे आव्हान आहे. यातच तृतीयपंथी यांचे जीवन भिक्षेवर चालत असताना त्यांना भेदभावाची वागणूक मिळत असते. याच पार्श्वभूमीवर युतकने तृतीयपंथी आणि समलिंगी व्यक्तींना विविध वस्तूंचे वाटप करत मदतीचा हात पुढे केला आहे.
यूतक (समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी आणि काम करणारी संस्था, आकुर्डी) तर्फे दि. २५ जुलै आणि २६ जुलै रोजी पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील १०७ तृतीयपंथी आणि १६ समलिंगी व्यक्तींना रेशन/अन्न धान्य आणि कोविड – १९ कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक मास्क, सनीटायझर व हातमोजे देऊन मदत करण्यात आली. चाकण, तळेगाव, मोशी, चिंचवड, पिंपरी, बिजलीनगर, वाल्हेकर वाडी, आकुर्डी, देहुगाव, देहूरोड, निगडी, रुपिनगर, काळेवाडी, वाकड, दापोडी, स्वारगेट, बाणेर येथील तृतीयपंथी आणि समलिंगी व्यक्तींना मदत करण्यात आली.
अनिल उकरंडे “तृतीयपंथी दुकानं आणि रस्त्यावर भिक्षा मागून आपली उपजीविका चालवीत असतात पण सध्याच्या बिकट परिस्थितीत आणि चालत असलेल्या संचारबंदीमुळे तृतीयपंथीचे जगणे मुश्किल होत आहे. अनेक गरीब समलिंगी स्त्री-पुरुष काम नसल्याने किंवा कामावरून कमी केल्याने बरोजगार झाले आहेत” ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही महिंद्रा लिमिटेड चाकण आणि बिंदू क्वियर राइट्स फाऊंडेशन, पुणे यांच्या साहाय्याने हा उपक्रम पार पाडला.
अनिल उकरंडे –
संस्थापक यूतक –
LGBTI समजासाठी काम)
( करणारी संस्था, आकुर्डी