Home News Pune : तापमान ; अति उष्णतेने सुरवात, दुष्काळाच्या दिशेने

Pune : तापमान ; अति उष्णतेने सुरवात, दुष्काळाच्या दिशेने

Temperature: Starting with extreme heat, moving towards drought

पुणे : बुधवारी राज्यात सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअसची नोंद सोलापुरात झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सर्वत्र पारा ३६ अंशांवर होता. तो मंगळवारी एक अंशांनी वाढून ३७.७ पर्यंत गेला. तर बुधवारी तापमानाचा पारा ३७.४ अंशांवर होता. सकाळी दहापासून चटके बसत होते. Pune news

पुणे, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर ई प्रमुख शहरात दुपारी तर संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

संपूर्ण मार्च महिना कडकडीत उन्हाळ्याने चटका देत आहे, तोच राज्यात उन्हाचा दाह आणखी तीव्र होताना दिसत आहेत. दर दिवसागणिक मुंबई, ठाणे आणि पालघरसह अलिबाग आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक राहिल्यानं उष्णता त्रासदायक ठरत आहे. Pune news

विदर्भात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे सरासरी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर होते. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३५ अंशांवर होते. सांताक्रुज येथे ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

जागतिक पातळीवर २०२३ हे वर्ष सर्वांत उष्ण ठरले आहे. या वर्षातील १२ महिन्यांचे सरासरी तापमान १.५ अंशांच्या गंभीर पातळीपर्यंत वाढल्याचे दिसून आल्याचे जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाणी टंचाई सुरू

देशाच्या बहुतांश भागांत मार्चच्या मध्यातच पाणी टंचाई तीव्र झाली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, नागालँड ही राज्ये भीषण टंचाईचा सामना करीत आहेत. महाराष्ट्रात मराठवाड्यात टंचाईची स्थिती आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यांसोबत टंचाईच्या झळाही वाढणार असल्यामुळे उपलब्ध जलसाठा जून अखेर पुरवून वापरण्याचे आव्हान आहे.

केंद्रीय जल आयोगाने देशातील प्रमुख १५० जलसाठ्यांतील पाण्याचा आढावा घेतला आहे, त्या नुसार आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत पाणी साठा २७ टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे.

महाराष्ट्रातील उजनी, जायकवाडी, कोयना,पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या धरण क्षेत्रात जानेवारीत पाण्याचा मृत साठा उरला आहे, त्यामुळे साखर कारखाने, शेती, उद्योग यांच्यासाठी अतिशय बिकट स्थिती आहे.

पाणी टंचाईमुळे शेतीतील उत्पादन आणि मासेमारीचं प्रमाण कमी होईल. परिस्थिती आणखी बिकट झाली तर उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Exit mobile version