Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणआदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावा - भारतीय ट्रायबल पार्टी ची...

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावा – भारतीय ट्रायबल पार्टी ची मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

अकोले आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावा, अशी मागणी भारतीय ट्रायबल पार्टी च्या जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी आदिवासी विकास प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत येत असलेल्या सर्व आदिवासी मुला मुलींच्या आश्रमशाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व इतर सुरक्षा कर्मचारी यांना चोवीस तास शाळेच्या परिसरातच व ज्या गावात दूर्गम भागात शाळा आहे. त्याच गावी मुक्कामी, निवासी राहणे बंधनकारक आहे.

हेही पहा ! आजपर्यंत सत्यनारायण पूजा पाहिली असेल, पण आदिवासी संस्कृतींची आगळीवेगळी पूजा जरुर पहा!

अनेक आदिवासी शाळेतील शिक्षक हे शाळेच्या परिसरात व त्याच गावी न राहता इतर शहरी वस्ती असलेल्या गावी आपल्या निवासस्थानी राहतात. त्यामुळे विद्यार्थीवर कुठलेही नियंत्रण राहत नाही. तसेच अनेकदा अनुचित प्रकार देखील घडण्याची दाट शक्यता असते. 

त्यामुळे येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

प्रशासन केलेल्या मागणीची अंमलबजावणी करणार का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. 


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय