मुंबई : राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या असून त्यात पुरूष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पँट आणि महिला शिक्षिकांना साडी, चुडीदार, कुर्ता, दुपट्टाचा पेहराव असे निश्चित करण्यात आले आहेत. यासोबतच शिक्षकांची समाजात एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या वाहनांवर अथवा नावापुढे डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर ‘टीआर’ अथवा मराठी ‘टी’ असा वेगळा उल्लेख केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.(Teachers Dress Code)
पेहरावाचा हा निर्णय राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्यांक संस्था, अनुदानित, स्वयंअथसहाय्यित आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू होणार आहे. शिक्षकांची जनमानसात त्यांच्या वेशभूषेमुळे वेगळी ओळख व्हावी, असा हेतू यामागे असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. (Teachers Dress Code)
डॉक्टरांचे Dr. तसे शिक्षकांचं Tr लागणार
एकीकडे राज्य सरकारने शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असेल तरी दुसऱ्या बाजुला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr)आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.(Teachers Dress Code)
शिक्षकांसाठी ड्रेसकोडचे नियम
राज्यातील शाळांमध्ये ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालता येणार नाहीत. शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडे परिधान करावे लागतील. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा. तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन असावा तसेच गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत.तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Teachers Dress Code)
शालेय शिक्षण विभागाने या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या असून त्यात सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, त्यात महिलांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा तर पुरूष शिक्षकांनी शर्ट, ट्राऊझर पँट आणि शर्ट इन करून तो परिधान करणे बंधनकारक आहे. पेहरावाला शोभतील असेच पादत्राणे शिक्षकांनी वापरावेत. पुरूष शिक्षकांनी शूजचा वापर करावा.स्काऊट गाईडच्या शिक्षकांनी स्काऊड गाईडचेच ड्रेस वापरावेतअसे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
हे ही वाचा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले
Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात
ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा
सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट