Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडTata Motors : ग्रामीण बाजारपेठेत वाहन विक्रीत (CV/PV) 4 पट वाढ

Tata Motors : ग्रामीण बाजारपेठेत वाहन विक्रीत (CV/PV) 4 पट वाढ

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या वाहन उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष 24 मध्‍ये देशाच्या ग्रामीण भागात विक्रीत प्रभावी कामगिरी केली आहे. प्रवासी वाहन विक्रीमध्ये 40% योगदान दिले. टाटा मोटर्सच्या नवीन फॉरएव्हर श्रेणीतील कार आणि SUV ग्रामीण ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत, 70% ग्राहक प्रथमच कार खरेदी करणारे आहेत.

Tata Motors ने मे 2024 मध्ये 76,766 व्यावसायिक वाहनांची विक्री केली आहे. मे 2023 मध्ये 74,973 युनिट्सच्या तुलनेत ती 2% ने जास्त आहे.

एकूण विक्रीमध्ये 29,691 युनिट्सची व्यावसायिक वाहन (comercial vehicles) विक्री 2% ने जास्त असून 47,075 प्रवासी वाहनांची ( passanger cars) विक्री केली आहे.

टाटा मोटर्सच्‍या कार्स व एसयूव्‍हींच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीची लोकप्रियता ग्रामीण ग्राहकांमध्‍ये देखील वाढली आहे. ज्‍यामध्‍ये 70 टक्‍के ग्राहक पहिल्‍यांदाच कार खरेदीदार आहेत.

मागील दहा वर्षात ग्रामीण भागात वाढलेल्या पायाभूत सुविधा तसेच टाटा मोटर्सचे सर्व्हिस नेटवर्क आणि डिजिटल उपलब्‍धता, ग्राहकांच्या खरेदी क्षमतेसह ग्रामीण व शहरी ग्राहकांच्या गरजा ओळखून टाटा मोटर्सने देशाच्या ग्रामीण भागात कार्सचे विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश मिळविले आहे. TATA MOTORS NEWS

टाटा कार्स व एसयूव्‍ही ऑफरिंग्‍जची प्रबळ न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणी विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्‍ये (petrol, CNG, electrical) उपलब्‍ध आहेत, त्यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या गरजांशी अनुकूल उत्तम पर्यायाची निवड करण्‍याची सुविधा मिळाली आहे. ग्रामीण बाजारपेठेत टाटा एसयूव्‍ही विक्री 35 टक्‍क्‍यांवरून 70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे. पर्यायी इंधन (सीएनजी + ईव्‍ही) विक्री आर्थिक वर्ष 2022 मधील 5 टक्‍क्‍यांवरून आर्थिक वर्ष 2024 मध्‍ये 23 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे. in in rural areas FY24, which contributed 40% to its total passenger vehicle sales

ग्रामीण भागांमधील ग्राहकांची मागणी एमटीवरून एएमटी/एटीमध्‍ये बदलत आहे. गेल्‍या आर्थिक वर्षाच्‍या तुलनेत ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनच्‍या प्रमाणात 14 टक्‍के वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सने राष्‍ट्रीय स्‍तरावर आपल्‍या नेटवर्कमध्‍ये वाढ केली आहे, ग्रामीण भागात विविध ठिकाणी 850 हून अधिक आऊटलेट्स कार्यरत आहेत, तसेच ग्रामीण भागांमधील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी 260 वर्कशॉप्‍स आहेत.

टाटा मोटर्सच्या 135 सर्व्हिस व्‍हॅन्‍स द्वारे (Anubhav mobile showrooms) रिमोट झोन किंवा आऊटलेट्स पासून थोडे दूर असलेल्या भागात ग्राहक सेवा तातडीने दिली जात आहे. (Tata Motors Introduces ‘Anubhav’ Mobile Showrooms for Rural Areas)


या सर्व्हिस व्‍हॅन्‍स मध्‍ये ऑडिओ व व्हिडिओ सुविधा आहे, त्यामुळे विद्यमान व भावी ग्राहकांना सर्व प्रकारची माहिती व सेवा कार्यक्षमपणे दिली जात आहे. TATA MOTORS

टाटा मोटर्सच्‍या कार्स व एसयूव्‍हींच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीने विशेषत: ग्रामीण ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या श्रेणीमध्‍ये भावी डिझाइन, उत्‍साहवर्धक कार्यक्षमता आणि अनेक प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत. टाटा मोटर्स भारतातील ग्रामीण भागांमधील यशाचे श्रेय त्‍यांची नाविन्‍यपूर्ण व्हेईकल्‍स आणि ग्रामीण ग्राहकांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांबाबत असलेल्‍या माहितीला जाते.

ग्रामीण बाजारपेठांच्‍या व्‍यापक क्षमता आणि ग्रामीण बाजारपेठा प्रदान करणाऱ्या संधींचा फायदा घेत टाटा मोटर्स बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्‍यासाठी विविध उपक्रम राबवत आहे.

बाजारपेठ क्रियाकलाप, रोडशोज, सेल्‍स मीलास, सर्विस कॅम्‍प्‍स आणि समुदाय-केंद्रित वर्कशॉप्‍स या सर्वांचा ग्रामीण भागांमधील विद्यमान व संभाव्‍य ग्राहकांसोबत कनेक्‍ट (Custmer connect) होण्‍याचे टाटा मोटर्सचे उद्दिष्ट आहे.

कंपनी ग्राहकांना नाविन्‍यपूर्ण आर्थिक योजनांसह पाठिंबा देत आहे. राष्‍ट्रीयकृत बँकांसह गावांमध्‍ये सखोल नेटवर्क्‍स असलेल्‍या बँकासोबत सहयोग केला आहे, तसेच कंपनीने अधिक करून स्‍थानिक व्‍यक्‍तींसाठी अनुकूल योजना सादर केल्‍या आहेत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांसाठी कापणीच्‍या हंगामानुसार 6 मासिक ईएमआय योजना द्वारे टाटा मोटर्सची वाहने ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहेत.

विशेषतः टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या (passanger cars) सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष दिलेले आहे, कारण त्याच्या सर्व नवीन SUV मॉडेल्सना आता ग्लोबल NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय