100 ते 300 युनिटपर्यंत 60 टक्के दरवाढ
मुंबई : टाटा वीज कंपनीने एप्रिलनंतर वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे.प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार पडणार आहे. या प्रस्तावावर जनतेच्या सूचना-हरकती मागवल्यानंतर वीज नियामक आयोग यावर निर्णय घेणार आहे.
हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त 58 टक्के पेक्षा जास्त वीजबिल भरावे लागेल.
टाटा कंपनीसोबत इतर वीजपुरवठा करणा-या कंपन्याही वीज दरात वाढ करण्याच्या विचारात आहेत. टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. टाटा वीज कंपनीने 0 ते 100 युनिटसाठी तब्बल 201 टक्के वाढ प्रस्तावित असून 100 ते 300 युनिटपर्यंत 60 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. तर 301 ते 500 युनिटपर्यंत 10 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सामान्य ग्राहकांच्या बिलामध्ये 100 युनिट्सपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रति युनिट दर सध्याच्या रु.3.74 वरून रु.7.37 पर्यंत वाढ करण्यात येणार आहे.101-300 युनिट्स वापरणाऱ्यांसाठी, दरांमध्ये प्रस्तावित वाढ रु.5.89 ते रु.9.31 (66%) आहे.
टाटा पॉवर सध्या मुंबईत सुमारे 7.50 लाख ग्राहकांना सेवा देत आहे. त्यात 5.5 लाख घरगुती वापरकर्ते आहेत. जे साधारणपणे दरमहा 300 युनिटपेक्षा कमी वापरतात.
केंद्र सरकारने वीज क्षेत्राचे खाजगीकरण करण्यासाठी मध्ये वीज सुधारणा विधेयक 2020 नुसार वीज निर्मिती,वितरण व दरवाढ यावरील नियंत्रण हटवले आहे.देशात वीज निर्मिती क्षेत्रात अदानी,टाटा,रिलायन्स आदी कंपन्या व उप कंपन्यांना वीज क्षेत्र खुले केले आहे.त्यामुळे भविष्यकाळात सरकार विजदरवाढीवर सामान्य ग्राहकांना सबसिडी देईल,अशी खात्री वाटत नाही.
मुंबईकरांना टाटा कंपनीचा ‘पॉवरफुल’ शॉक:58 टक्के वीज दरवाढ होणार
संबंधित लेख