Friday, December 27, 2024
Homeआरोग्यतलासरी : उधवा येथील आश्रम शाळेतील कोव्हीड केअर सेंटरचे आमदार निकोले यांच्या...

तलासरी : उधवा येथील आश्रम शाळेतील कोव्हीड केअर सेंटरचे आमदार निकोले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

तलासरी (पालघर) : तालुक्यातील उधवा येथील आश्रमशाळे १० ऑक्सिजन व ९० सीसीसी असे एकूण १०० बेडची व्यवस्था असणारे कोविड केअर सेंटरचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

डहाणू व तलासरी तालुक्या मध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तलासरी तालुक्यातील उधवा आश्रम शाळा येथे १० ऑक्सिजन व ९० सीसीसी अशा एकूण १०० बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असल्याचे आ. निकोले म्हणाले.

यावेळी या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधां विषयीचे कौतुक देखील आ. निकोले यांनी केले.

यावेळी प्रांताधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार स्वाती घोंगडे, गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे, सभापती कॉ.नंदू हाडळ, माजी जि.प सदस्य अक्षय दवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश पटेल, डॉ. आदित्य अहिरे हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय