Roshan Singh Sodhi : सोनी सबवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिका सातत्याने कोणत्या ना कोणत्या चर्चेत असते आता पुन्हा या मालिकेतील एक संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. या मालिकेतील रोशन सिंग सोढी (Roshan Singh Sodhi) ही भूमिका साकारणारा अभिनेता बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका देशातील घराघरात पोहोचलेल्या मालिकांपैकी एक आहे. मात्र या मालिकेतील रोशन सिंग सोढी (Roshan Singh Sodhi) भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग अचानक गायब झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अभिनेता गुरुचरण सिंग हा गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. अभिनेता गुरुचरण सिंग अचानक गायब झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आता त्याचा शोध सुरू आहे.
22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी गुरुचरण सिंग घरातून निघाला होता. मात्र, तो मुंबईला पोहोचलाच नाही. तसंच दिल्लीतील आपल्या घरीदेखील तो आला नाही. विमानतळावर अधिक माहिती घेतली असता गुरुचरण सिंह विमानात बसलाच नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गुरुचरण सिंग याने 4 दिवसांपूर्वी वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर त्याने शेअर केला होता. अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वडिलांसोबत खास व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा :
शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ
ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!
नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई
मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी
बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!
ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला