Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविशेष लेख:महाराष्ट्र जनभूमी:होनाजी बाळा आणि घनश्याम सुंदरा,पुन्हा आठवावी पुण्याची जोडी

विशेष लेख:महाराष्ट्र जनभूमी:होनाजी बाळा आणि घनश्याम सुंदरा,पुन्हा आठवावी पुण्याची जोडी

होनाजी बाळा (इ.स. १७५४ – इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जात होत्या,होनाजी बाळा या नावाने!

होनाजी शिलारखाने जातीने नंदगवळी, पंथाने लिंगायत आणि धंद्याने गवळी. ह्याच्या घराण्यात किमान तीन पिढ्या शाहिरी पेशा चालत आलेला होता. प्रसिद्ध शाहीर साताप्पा किंवा सातप्पा हे त्याचे आजोबा, तर बाळा बहिरू हे शाहीर त्याचे चुलते. ह्या दोघांच्या काही लावण्या उपलब्ध आहेत. होनाजी लावण्या रचित असे आणि त्याचा मित्र बाळा कारंजकर हा त्या सुरेल आवाजात गात असे. होनाजी आणि बाळा ह्या जोडीमुळे होनाजीच्या तमाशाला ‘होनाजी बाळाचा तमाशा’ असे नाव पडले. होनाजीच्या लावण्यांतही म्हणे होनाजी बाळ,हा हा सांगा मुकुंद कुणी हा पहिला,असा शेवट जोडनाव गोवलेलला आहे. लावण्या आणि पोवाडे मिळून त्याच्या सुमारे 250 रचना आहेत.

दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी ते सुप्रसिद्ध झाले.
त्यांच्या लावण्या गाणी आजही प्रसिध्द आहेत.

होनाजी बाळा-अमर भूपाळी

सुप्रसिद्ध लावण्या
गोल तुझ्या शरीराचा (लावणी)

छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी (लावणी)

घडीघडी अरे मनमोहना

घनश्याम सुंदरा श्रीधरा (भूपाळी)

तुझ्या प्रीतीचे दुःख मला (गीत)

तू पाक सूरत कामिना (लावणी)

नको दूर देशी जाऊ (विरहगीत)

लटपट लटपट तुझं चालणं (लावणी)

वक्रतुंड गजानन पावला (नांदी)

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला (गीत)

श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड (नाट्यगीत)

आपल्या पौराणिक लावण्यांत त्याने कवी श्रीधर आणि मुक्तेश्वर ह्यांचे अनुकरण केले आहे, ही बाब ह्या संदर्भात लक्षात घेण्या-सारखी आहे. त्याच्या लावण्यांत शृंगारपर लावण्या अधिक आहेत. आपल्या लावण्यांतून त्याने प्रीतीच्या छटा – विशेषतः स्त्रियांच्या भावना – समरसतेने रंगविल्या आहेत. अश्लील लावण्याही त्याने लिहिल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाची त्याच्यावर विशेष मर्जी होती. दुसऱ्या बाजीरावाला खूष करण्यासाठी त्याने काही लावण्या रचल्या. दुसऱ्या बाजीरावाच्या प्रोत्साहनाने त्याने रागदारीत लावण्या रचावयास सुरुवात केली, असे म्हणतात. लावण्या रागदारीत रचल्यामुळे फडावरील लावणी बैठकीत प्रविष्ट झाली. प्रासादिकता हे त्याच्या रचनांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. होनाजीने रचिलेल्या पोवाड्यांत खर्ड्याच्या लढाईवरचा त्याचा पोवाडा प्रसिद्ध आहे. होनाजीने रचिलेली ‘घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ ही भूपाळी विशेष लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक – व्ही. शांताराम यांनी अमर भूपाळी ह्या नावाने होनाजीवर चित्रपट काढला आहे. चित्रशाळा, पुणे ह्या प्रकाशन संस्थेने होनाजी बाळा यांच्या लावण्या प्रसिद्ध केल्या (१९२४). 


होनाजी सासवड मधील धान्य बाजारपेठेतील शेंडग्यांच्या दुकानाच्या आसपास राहत होता . आजोबा शांताप्पा शिलारखाने आणि चुलता बाळा शिलारखाने हे नावाजलेले शाहीर होते त्यांचाच व्यवसाय होनांजी करू लागला . पेशवे वाड्यावर दूध घालणे आणि सध्याच्या पालखी मैदान आणि सोपाननगर परिसरामध्ये गाई चारणे
.. यदिनक्रमातून “घनश्याम सुन्दर श्रीधरा अरुणोदय झाला “या प्रसन्न सात्विक व श्रध्दामय भूपाळीचा जन्म झाला तो या सासवडच्या माळावर

येथील कालभैरवनाथास पहिले शाहिरीचे पुष्प येथेच त्यांनी वाहिले. मराठीशाहीच्या उदयाबरोबरच शाहिरी काव्य जन्माला आले विस्ताराबरोबरच वाढले आणि अस्ताबरोबरच विराम पावले पोवाड्यात वीररसानी बहू रुंद झालेतसेच शृंगारिक लावणीने मनधुंद झाले असे हे लावणी आणि पोवाडे वाड:मय,शृंगारप्रिय रसिक महाराष्ट्राच्या “अमर भूपाळीकार” शाहीर होनाजी बाळाच्या डफच्या थापेवर अन तुणतुण्याच्या तारेवर आख्या महाराष्ट्र डोलला.
होनाजीचा चुलता बाळा आणि त्याच्या एक रंगारी मित्र बहिरू हा रंगारी होता त्यांचा वारसा होनाजीने त्याचा मित्र बाळा करंजकर याला बरोबर घेऊन चालवला. बाळा करंजकर हा सासवड मधील शिंद्यांच्या वाड्यात भैवनाथ मंदिर जवळ राहत होता .
बाळा करंजकरानेही या महाराष्ट्राला उत्कृष्ट लावण्या दिल्या आहेत.होनाजी त्याचे रचलेल्या लावण्या म्हणत असे जिवलंग मैत्रीमुळे” होनाजी बाळा “हे नाव इतिहासात अजरामर झाले .
होनाजी सासवड मधील धान्य बाजारपेठेतील शेंडग्यांच्या दुकानाच्या आसपास राहत होता . आजोबा शांताप्पा शिलारखाने आणि चुलता बाळा शिलारखाने हे नावाजलेले शाहीर होते त्यांचाच व्यवसाय होनांजी करू लागला,पेशवे वाड्यावर दूध घालणे आणि सध्याच्या पालखी मैदान आणि सोपाननगर परिसरामध्ये गाई चारणे
.. यदिनक्रमातून “घनश्याम सुन्दर श्रीधरा अरुणोदय झाला “या प्रसन्न सात्विक व श्रध्दामय भूपाळीचा जन्म झाला तो या सासवडच्या माळावर,पेशवाई व मराठीशाहीच्या उदयाबरोबरच शाहिरी काव्य जन्माला आले विस्ताराबरोबरच वाढले आणि अस्ताबरोबरच विराम पावले पोवाड्यात वीररसानी बहू रुंद झालेतसेच शृंगारिक लावणीने मनधुंद झाले असे हे लावणी आणि पोवाडे वाड:मय,शृंगारप्रिय रसिक महाराष्ट्राच्या “अमर भूपाळीकार” शाहीर होनाजी बाळाच्या डफच्या थापेवर अन तुणतुण्याच्या तारेवर आख्या महाराष्ट्र डोलला .
होनाजीचा चुलता बाळा आणि त्याच्या एक रंगारी मित्र बहिरू हा रंगारी होता त्यांचा वारसा होनाजीने त्याचा मित्र बाळा करंजकर याला बरोबर घेऊन चालवला.बाळा करंजकर हा सासवड मधील शिंद्यांच्या वाड्यात भैवनाथ मंदिर जवळ राहत होता .
बाळा करंजकरानेही या महाराष्ट्राला उत्कृष्ट लावण्या दिल्या आहेत.होनाजी त्याचे रचलेल्या लावण्याची म्हणत असे.जिवलंग मैत्रीमुळे” होनाजी बाळा “हे नाव इतिहासात अजरामर झाले,दुःख एकच की,साहित्य,संगीत,कला क्षेत्रातील होनाजी बाळा या पुण्याच्या बहुजन कलाकारांना इतिहासाच्या कालकुपित संगीत कला प्रेमींनी स्थान दिले पाहिजे.

क्रांतिकुमार कडुलकर-पिंपरी चिंचवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय