Thursday, July 18, 2024
Homeजिल्हासोयाबीन बियाणांच्या वाढत्या किमती ; व्यापाऱ्याचे षडयंत्र !

सोयाबीन बियाणांच्या वाढत्या किमती ; व्यापाऱ्याचे षडयंत्र !

पुणे – यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजने घेतलेल्या सोयाबीन बियाणाच्या दरवाढ  निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाबीजने सोयाबीनच्या दरात ४० टक्के वाढ केली आहे तर या भाववाढीचा आधार घेत खाजगी कम्पन्यांनी ८० टक्के दरवाढ केली आहे!म्हणजेच ३० किलो सोयाबीन महाबीजच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांना सुमारे १७०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

गतवर्षी महाबीजच्या सोयाबीनची गोणी २२५० रुपये होती, मात्र आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ऐन खरीपाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. महाबीजच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र, यंदा सोयाबीनच्या त्याच बियाणासाठी शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

महाबीज प्रशासनाने बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. गतवर्षी काढणीच्या वेळी पावसामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. त्यामुळे महाबीजला पुन्हा उन्हाळी हंगामात बीजोत्पादनाचा कार्यक्रम सुरू करावा लागला होता.हंगामात शेवटी सोयाबीनला ७००० रुपये क्विन्तल भाव मिळाला परंतु तोपर्यंत ९० टक्के शेतकर्यांचा माल विकून झाला होता. खरा फायदा स्टोकिस्ट व मोठ्या व्यापार्यांना झाला आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ उतार, पहा काय आहेत आजचे दर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय