Thursday, March 28, 2024
Homeकृषीसोयाबीन बियाणे घेताना फसवणूक होण्याची शक्यता, अशी घ्या काळजी !

सोयाबीन बियाणे घेताना फसवणूक होण्याची शक्यता, अशी घ्या काळजी !

 

पुणे : सोयाबीन पीक हे अतिशय महत्वाचे व नगदी पीक म्हणून महाराष्ट्रात घेतले जात आहे, त्यामुळे शेतकरी जागरूक होवून नवीन तंत्रज्ञान तसेच वाण यांचा वापर करून आपले उत्पादवाढीसाठी प्रयत्न करत आहेत, ही एक शेतीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.गेली १५-२० वर्षे महाराष्ट्र तसेच देशात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे, आणि अगदी मागील २-३ वर्षे सोडले तर, प्रामुख्याने JS-३३५ वाणाचे क्षेत्र बघितले तर ९० टक्के व त्यापेक्षा जास्त होते, हा एकच वाण मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जात होता.

अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात चढ उतार, पहा काय आहेत आजचे दर

सोयाबीन पीक संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठ, ( राहुरी, अकोला, परभणी ) यांनी मागील ७-८ वर्षात अनेक जास्त उत्पादन देणारे वाण शोधले व त्यानंतर हळूहळू नवीन वाण शेतकरी लागवड करू लागले, प्रामुख्याने राहुरी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन ब्रीडर डॉ मिलिंद देशमुख सर, यांचे फुले संगम हे वाण क्रांतिकारी ठरले, त्यानंतर फुले किमया, तसेच PKV अंबा, MAUS ६१२ हे वाण सुध्दा शेतकरी पसंतीस आले व गेल्या २ वर्षापासून शेतकरी नवीन वाण पेरू लागले आहेत व उत्पादनात वाढ सुध्दा झाली आहे, परंतु हे सर्व होत असताना यातून काही वेगळ्या गोष्टी सुध्दा घडू लागल्या आहेत, ते म्हणजे बियाणे व्यापार  म्हणजे जास्त उत्पादन देणारे वाण असा प्रचार करून महाग बियाणे विकणे .

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

कोणतेही वाण विकसित होते त्याचे उत्पादन चांगले असतेच किंवा ते रोग प्रतिकारक असते, परंतु असा (डबल उत्पादन देणारे वाण) सांगणे कितीपत योग्य आहे, आणि यात काही वस्तिविकात तरी आहे का, शक्य आहे का डबल उत्पादन मिळणे, ठीक आहे १०-२० टक्के उत्पादन वाढ असेल आणि रोग प्रतिकारक असेल याचा अर्थ संगम आणि किमया यांचे पेक्षा दुप्पट उत्पादन मिळेल असा होत नाही. याठिकाणी आपण अफवांना बळी पडू नये.राहुरी कृषी विद्यापीठाचे फुले संगम, फुले किमया तसेच परभणी चे MAUS-६१२, PKV अंबा हे मागील २-३ वर्षात आलेले वाण आहेत आणि अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण आहेत, त्यामुळे यांची निवड करा उगाच जास्तीचे पैसे मोजून खात्री नसलेलं बियाणे का खरेदी करायचे, या वर्षी नाहीतर पुढील वर्षी नक्कीच आपल्याला बियाणे मिळेल ना.

ब्रेकिंग : राज्यसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला मोठा धक्का

राहिला मुद्दा तो वास्तविकतेचा  तर कोणतेही वाण विकसित झाले तरी डबल उत्पादन मिळणे शक्य नाही त्यामुळे हा संभ्रम दूर करा, उत्पादन हे संगम आणि किमया या वाणांचे सुद्धा अतिशय चांगले त्यामुळे उगाच खात्री नसलेले बियाणे वाजवी दरात खरेदी करून आपली फसवणूक करून घेऊ नका व दुसऱ्यांची सुद्धा करू नका.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय