सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या व सिटू संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन च्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर युनियनच्या सर्व तालुका कमिटी यांच्यावतीने विविध तालुक्यात गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदने देण्यात आली व आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना देण्यात आले.
आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य विभागात सामावून घ्या, आशा व गटप्रवर्तकांचे थकीत सर्व मानधन वाढीव रकमेसह त्वरित अदा करण्यात यावे, कोविड-१९ च्या काळात आशांना देण्यात येणारा १००० रुपये व गटप्रवर्तकांना देण्यात येणारे ५०० रुपये भत्ता पूर्ववत सुरू करावे,
कोविड लसीकरणासाठी सोशल मोबिलाईझर म्हणून आशा व गट प्रवर्तकांसाठी २०० रूपये मोबदला त्वरित अदा करण्यात यावा, आशा व गट प्रवर्तकांकडून अनेक कामे विना मोबदला करून घेतल्या जाते ते बंद करावे आदी मागण्यांना घेऊन हे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
सर्व शिष्टमंडळात जिल्हा कमिटी सदस्य नम्रता वळंजू, प्रियांका तावडे, रूचिका पवार, विद्या सावंत, नीलिमा सारंग, सेजल जाधव, अमिता पेंडूरकर, विनोद पाटील आदींसह आशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.