Wednesday, February 19, 2025

व्हिडिओ : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर ६ वाहनांचा भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ ६ वाहणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना खोपोलीजवळ आज (मंगळवार) पहाटे साडे सहा वाजता दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत आणि ५ किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलच्या एमजी एम रूग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

“व्हॅलेंटाईन्स डे” ला विरोध करत भर रस्त्यात फाशी, व्हिडिओ व्हायरल

केंद्र सरकारची मोठी कारवाई, आणखी ५४ चीनी ॲप्सवर बंदी

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल, देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस दाखल झाले. 

दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. सर्व वाहने बाजुला काढल्याने वाहतूक पुर्वपदावर येत आहे.

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles