पिंपरी चिंचवड : श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. बुधवारी रात्री १० ते १२ वाजेपर्यंत जन्माष्टमीचे ह.भ.प.श्री व्यंकट महाराज बोळेगांवकर यांचे संपन्न झाले. रात्री ठीक १२ वाजता श्रीकृष्ण जन्म झाला. महिला मंडळाकडून जन्माचा पाळणा म्हणण्यात आला. Shree Krishna Janmashtami ceremony concluded at Shree Swami Samarth Temple in Shivtejnagar
दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री व्यंकट महाराज बोळेगांवकर व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने संपन्न झाले. या प्रसंगी ठीक १२ वा.दहिहांडी फोडण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. त्याच बरोबर या कार्यक्रमास प्रामुख्याने दिपक पाटील यांचे योगदान लाभले असून उत्सव प्रमुख म्हणून प्रा हरिनारायण शेळके यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती दर्शविली. शेवटी प्रसादाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.