Saturday, May 4, 2024
HomeAkoleश्रद्धा चिखले-भवारी यांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार

श्रद्धा चिखले-भवारी यांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार

अकोले : श्रद्धा सुशीलकुमार चिखले-भवारी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत कृषी उपसंचालक पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

श्रद्धाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत पहिल्याच प्रयत्नात कृषी उपसंचालकपदीपर्यंत मजल मारली आहे. तिचे समाजातून कौतुक होत आहे. त्याप्रसंगी माजी मुख्याध्यापक बाळासाहेब चिखले, महाराष्ट्र पदवीधर संघाचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले व युवा उद्योजक प्रदीप गोडे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय