Mauli Khandagale : जुन्नर तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी शिवसेना पक्षाचा आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत. जर पक्षाने एबी फाॅर्म दिला नाही तर अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे त्यांनी कालच्या मेळाव्यात जाहीर केले होते. तसेच महाविकास आघाडीने अजूनही विचार करून शिवसेनेला जागा सोडावी अशी विनंती त्यांनी केली.
उमेदवारी अर्ज भरताना माऊली खंडागळेंच्या माजी सहकारी भाजप नेत्या आशाताई बुचके या देखील उपस्थित होत्या. त्यांनी माऊली खंडागळे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. माऊली खंडागळे यांनी चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. माऊली खंडागळे म्हणाले की मला माझ्या मोठ्या बहीणीचा आशीर्वाद आहे आता मला आमदार होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यांनी आशाताई बुचके यांचे आभार मानले. आशाताई बुचके यांच्या उपस्थितीने सर्व शिवसैनिकांमध्ये चैतन्य पसरले. आशाताई बुचके माऊली खंडागळे यांच्या पाठिशी असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. तालुक्यात विविध पक्षांत विभागला गेलेला मुळ शिवसैनिक पुन्हा एक होऊन आपल्या जुन्या सहकाऱ्याला आमदार करण्यासाठी सरसावताना दिसत आहे.
महाविकास आघाडीत जुन्नरची जागा शिवसेनेला सोडावी अशी तालुक्यातील शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी होती. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही मागणी धुडकावून लावत ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाला सोडली. राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाने काॅंग्रेसमधून आयात केलेल्या सत्यशील शेरकरांना उमेदवारी दिली. निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय झाल्याने शिवसैनिक भडकले आहेत. कालच्या मेळाव्यात तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत माऊली खंडागळेंना अपक्ष उमेदवारीचा आग्रह धरला. त्यात जाहीर केल्याप्रमाणे आज माऊली खंडागळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला.
Mauli Khandagale
यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई बुचके, मा. जिल्हाप्रमुख सुनीलभाऊ मेहेर, मा. तालुका समन्वयक प्रसन्नअण्णा डोके, विधानसभा संघटक बाबूभाऊ पाटे, मा. जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, तालुका समन्वयक बाबाशेठ परदेशी, मा. पंचायत समिती सदस्य जयवंतशेठ घोडके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्करशेठ गाडगे, मा. पंचायत समिती सदस्य काळू गागरे, मा. पंचायत समिती सदस्य जीवनशेठ शिंदे, तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित