Tuesday, November 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अजित गव्हाणे यांच्या प्रचारात घुमला; 'राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी'चा...

PCMC : अजित गव्हाणे यांच्या प्रचारात घुमला; ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’चा नारा

अजित गव्हाणे यांचा कार्यकर्त्यांकडून जोशात प्रचार (PCMC)

अजित गव्हाणे यांचे फटाके वाजवून, औक्षण करून ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आज (बुधवारी) प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)

या निमित्ताने गव्हाणे यांनी मतदारांशी संपर्क साधला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यावेळी “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी” अशी घोषणा ठिकठिकाणी ऐकायला मिळत होती.

अजित गव्हाणे यांनी बुधवारी झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी नागरिकांनी फटाके वाजून त्यांचे स्वागत केले.

महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून “विजयाचा तिलक” लावला. दिघी रोड, स्वामी समर्थ कॉलनी, शिवशक्ती मित्र मंडळ रस्ता, संभाजी नगर, आळंदी रोड, ओम साई कॉलनी, संत तुकाराम नगर, श्रीराम कॉलनी या ठिकाणी प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी गव्हाणे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. येथील व्यापाऱ्यांशी त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. मतदारांशी संवाद साधताना येथील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे असे यावेळी गव्हाणे म्हणाले. (PCMC)

दरम्यान “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी”, तुतारी वाजणार बदल घडणार, अशा घोषणांनी भोसरी परिसर दुमदुमून गेला होता.

माजी नगरसेवकांची उपस्थिती लक्षवेधी

दरम्यान या आजच्या प्रचार दौऱ्यात माजी नगरसेवकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी माजी नगरसेविका प्रियांका बारसे म्हणाल्या, भोसरी मतदारसंघात गेल्या दहा वर्षात दुजभावाची वागणूक दिली गेली. प्रत्येक ठिकाणी दादागिरी, मोजक्याच लोकांना, त्याच त्या लोकांना ठेकेदारी देणे असे प्रकार वाढत आहे. नगरसेवकांना देखील कामाचे कोणतेही स्वातंत्र्य मिळू दिले नाही त्यामुळेच आम्ही सर्व नाराज आहोत या नाराजीतूनच भोसरी विधानसभेत परिवर्तन अटळ आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय