Friday, February 21, 2025

घोडेगावमध्ये आदिम संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी

घोडेगाव : आदिम संस्कृती अभ्यास संशोधन आणि मानव विकास केंद्र या संस्थेच्या वतीने घोडेगाव येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व उपस्थितांनी ‘शिवरायांचे योगदान व आजची परिस्थिती’ या विषयावर चर्चा केली. (Shiv Jayanti)

यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. व यावेळी बोरघर गावचे उपसरपंच राजू घोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषिविषयक धोरण, जनतेच्या प्रति असलेली बांधिलकी याविषयी मांडणी केली. (Shiv Jayanti)

यावेळी ते म्हटले कि, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या शासनकर्त्यांनी आपल्या कृतीमध्ये आणून खऱ्या अर्थाने जनतेची लोकशाही प्रस्थापीत करून, शेतकरी व कष्टकरी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’ यावेळी त्यांनी सर्वांना आवाहन केले कि शिवरायांचे धैर्य, शासन कौशल्य आणि न्यायाप्रती अढळ वचनबद्धता हि मुल्ये स्वतःच्या जीवनात आत्मसात करायला हवीत.

या कार्यक्रमाची प्रस्तावना महेश गाडेकर यांनी केले व आभार सुप्रिया मते यांनी मांडले. यावेळी आदिम संस्थेचे समीर गारे, प्रा.स्नेहल साबळे, कमल बांबळे, दीपक वालकोळी, रोहिदास फलके, संगीता हिले, दिपाली खामकर, सतीश लोहकरे, रोहिदास फलके आदी यावेळी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री

ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; काँग्रेसकडून तीव्र विरोध

तुमचं UPI व्यवहार अयशस्वी झाल्यास आता त्वरित रिफंड मिळणार

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, 22 मार्चपासून रंगणार खेळ

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पंतप्रधान मोदींनी केले आवाहन

ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांसाठी भरती, वाचा संपुर्ण माहिती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles