Sunday, July 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशरद पवार - राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

शरद पवार – राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ‘लोक माझा सांगाती’ या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.नवा अध्यक्ष कोण होणार हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं असंही पवारांनी सांगितलं.

गेले काही दिवस राजकीय वर्तुळात अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चर्चा होत असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणं यामुळे नव्या समीकरणांना वेग येणार आहे.

शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार अशी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तुम्ही ही घोषणा मागे होत नाही तोवर आम्ही सभागृह सोडणार नाही असं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यांना शांत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे असंही दिसलं. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेतेही कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन करत होते.कार्यकर्ते शरद पवाारांचं नाव घेऊन घोषणा घेतानाही दिसले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय