Saturday, May 18, 2024
Homeराज्यशिक्षण आणि रोजगारच्या मागणीसाठी एसएफआय, डिवायएफआय चा उद्या मंत्रालयावर मोर्चा

शिक्षण आणि रोजगारच्या मागणीसाठी एसएफआय, डिवायएफआय चा उद्या मंत्रालयावर मोर्चा

विद्यार्थी – युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : द्वेष,खोटारडेपणा आणि हिंसा पसरवणे बंद करा,शिक्षण वाचावा आणि रोजगार द्या याप्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यासाठी एसएफआय व डिवायएफआय संघटनेच्या नेतृत्वाखाली ३१ जानेवारी रोजी मंत्रालयावर युवा विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थी युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एसएफआय व डिवायएफआय पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यात व देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील लाखो जागा वर्षानुवर्षे सरकार भरत नाही. उलट त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यामुळे कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात आणल्य आहेत. यातून सुशिक्षित तरुण वर्गात अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यात सरकारी शाळा दत्तक देऊन त्यांना खाजगी करण्याचा घाट घातला गेला आहे. हा निर्णय दुर्बल समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारा आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन विशेषतः व्यावसायिक शिक्षणाची फी लाखोंमध्ये वाढली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याच्या विद्यार्थी संख्येत मोठी कपात केली आहे. शिक्षणात अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. याला वाचा फोडण्यासाठी एसएफआय आणि डिवायएफआय ने ‘युवा – विद्यार्थी मार्च’ मुंबई येथे आयोजित केला आहे.

शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठी मुंबईत मंत्रालयावर निघणाऱ्या राज्यव्यापी मोर्चात विद्यार्थी आणि युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नंदकुमार हाडळ, दत्ता चव्हाण, सोमनाथ निर्मळ, रोहिदास जाधव, अविनाश गवारी, नवनाथ मोरे, विलास साबळे, राजू शेळके, समीर गारे, संदिप मरभळ, अक्षय घोडे, दिपक वाळकोळी, अक्षय साबळे आदींनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय