Friday, November 22, 2024
Homeराजकारण‘आव्हाड साहेब आपण जितके भावनिक व तितकेच आक्रमक नेते’ आव्हाडांना अमोल मिटकरी...

‘आव्हाड साहेब आपण जितके भावनिक व तितकेच आक्रमक नेते’ आव्हाडांना अमोल मिटकरी काय म्हणाले पहा !

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड करून शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेला आज एक आठवडा होत आहे. या बंडानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असा पॉवर गेम राज्याच्या राजकारणात सुरू आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील अजित पवारांविरोधात मैदानात उतरले असून राज्य भरात दौरे करायला सुरूवात केली आहे. नुकतच शरद पवारांचा नाशिक दौरा झाला. या दौऱ्यावेळी शरद पवार पावसात भिजल्याचा फोटो व्हायरल झाला. पवारांसोबत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवारांचा पावसात भिजल्याचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरून अजित पवार गटासोबत असलेले आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांना टोला लगावला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आव्हाड साहेब आपण जितके भावनिक व तितकेच आक्रमक नेते. पवार साहेबांवरील आपली निष्ठा खरोखर वाखाणण्यासारखी आहे. अजितदादा भाषणात जे बोलले त्या काळजीमागे हाही एक फोटो महत्त्वाचा ! वयाच्या 82 व्या वर्षी आपण त्यांना स्वतः पाण्यात भिजायला लावले असा टोला लगावत दादांची चुक काय ते सांगाल का? असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी छगन भुजबळांचा बालेकिल्ला असणाऱ्या येवल्यात जाऊन जोरदार सभा घेतली. त्यावेळी शरद पवारांचा पावसात भिजल्याचा फोटो जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत ‘तेरे हर वार का पलटवार हू…’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं होतं.

हे ही वाचा :

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख

लोकप्रिय