Friday, November 22, 2024
Homeजुन्नरJunnar : जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्य केळी गाव…

Junnar : जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्य केळी गाव…

जुन्नर (Junnar) पासून साधारण १४ कि.मी अंतरावर असणार केळी गाव आहे. गावाला चारही बाजूने निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. पश्चिमेला चावंड किल्ला व चावंड गावची शिव आहे. उत्तरेला माणिकडोह धरण व ऐतिहासिक माणकेश्वर गावची शिव लागते. दक्षिणेला गावदेवी आई कुंभाई मातेचा डोंगर (टेकडी) व डोंगराच्या उंच माथ्यावर कुंभाई माता गावचे रक्षण करत आहे. पूर्वेला आपटाळे गावची शिव व दाट झाडीने वेढलेली आपटाळ्याची खिंड आहे. खिंडीत दाट असणारी झाडी आज मात्र पाहायला मिळत नाही.

केळी गावात लांडे, म्हसकर, बांडे, गवारी, उतळे, कोंदे, भोजने, ताजवे, गाडेकर, शेळकंदे, मुंढे, साबळे व तुरे आदी आडनावाचे लोक राहतात. गावातील ९८% लोक हे आदिवासी महादेव कोळी जमातीचे असून, सुतार समाजातील काही कुटुंबेही येथे वास्तव्यास आहेत. नवबौद्ध समाजाचे गावात एक घर असून आजमितीला तेथील कुटुंब हे कामानिमित्त परगावी स्थायिक झालेले आहे. केळी गावाला गावठाण (यात्रा भरण्याचे ठिकाण), गवारवाडी, म्हसकरवाडी, बांडेवाडी (आळी), केळी फाटा, वळणवाडी, चावंड फाटा अश्या विविध वाड्या आहेत.

होय, हे खरं आहे की गावातील बहुतांशी लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ते दिवसभर राब राबून, घाम गाळून शेतात गहू, बाजरी, भात, कडधान्य आणि इतर अनेक पिके घेतात. (Junnar)

पावसाळ्यात कुंभ्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे खरंच एक अविस्मरणीय दृश्य आहे. पर्यटकांना हे दृश्य आकर्षित करते, यात शंका नाही. परंतु धबधब्याकडे जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने अनेक पर्यटकांना फक्त दूरवरूनच धबधब्याचे दर्शन घ्यावे लागते. हे निश्चितच निराशाजनक आहे.

या समस्येवर उपाय म्हणून, पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग बांधणे गरजेचे आहे. यामुळे पर्यटकांना धबधब्याच्या जवळ जाऊन त्याचे सौंदर्य मनसोक्त आनंद घेता येईल. यासोबतच, धबधब्याच्या परिसरात स्वच्छता राखणे आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा पुरवणे देखील महत्त्वाचे आहे. (Junnar)

जर असे केले गेले तर कुंभ्याच्या डोंगरावरील धबधबे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनू शकतात. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. याव्यतिरिक्त, पर्यटकांना धबधब्याबद्दल आणि त्याच्या परिसरातील जैवविविधतेबद्दल माहिती देण्यासाठी माहिती फलक लावणे उपयुक्त ठरेल.

अशा प्रकारे, योग्य नियोजन आणि विकासामुळे कुंभ्याच्या डोंगरावरील धबधबे पर्यटकांसाठी एक आकर्षक आणि निसर्ग पर्यटनाचे ठिकाण बनू शकतात. म्हसकर फाट्याच्या वरच्या बाजूला डोंगरात असलेली फुंळगीची खिंड आजही बंडकरी कोंड्या नवले आणि त्यांच्या ३१ साथीदारांच्या आठवणी सांगते.

निसर्गाने समृद्ध आणि विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेले हे छोटे गाव नक्कीच पाहण्यासारखे आहे.

– किरण म्हसकर, केळी
9011110569

whatsapp link

हे ही वाचा :

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

संबंधित लेख

लोकप्रिय