केंद्र सरकारचा निषेध व शेतकरी आंदोलनास सक्रीय पाठिंबा!
नांदेड : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डावी लोकशाही आघाडी व मित्र पक्ष संघटनांच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य बैठा सत्याग्रह करण्यात आला. तसेेच नांदेड शहरात व्यापाऱ्यांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी बंदला उत्सफूर्त प्रतिसाद देत मोदी सरकारच्या विरोधातील बंद यशस्वी झाला असल्याचे माकपने म्हटले आहे.
अन्नदाता शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डाव्या आघाडीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्यूलर, वंचित बहूजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, एम.पी.जे.बसव ब्रिगेड, लहूजी शक्ती सेना, भाकप युनायटेड, अ.भा.अंंनिस, टायगर ॲटो संघटना, भाकप(माले) सह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ॲड. प्रदीप नागापूरकर, विजय गाभणे, माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, गंगाधर गायकवाड, उज्वला पडलवार, ॲड.अविनाश भोसीकर, प्रा.डॉ.मारोती तेगमपूरे, प्रा.राजू सोनसळे, शिवाजी फूलवळे, के.के.जांबकर, प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे, डॉ.किरण चिद्रावार, बि.के.पांचाळ, प्रा.कोंपलवार, संतोष शिंदे, ईरवंत सुर्यकार आदीसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.