Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणसातेवाडी जिल्हा परिषद गट कोरोनामुक्त करण्याचा निर्धार - सुशिलकुमार चिखले

सातेवाडी जिल्हा परिषद गट कोरोनामुक्त करण्याचा निर्धार – सुशिलकुमार चिखले

अकोले : राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांचा जिल्हा परिषद गट कोरोनामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अकोले तालुक्यातील दुर्गम पश्चिम आदिवासी भागात कोरोना दाराजवळ येईन ठेपला आहे.ग्रामीन भागात कोरोना य या रोगाविषयी भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात कल्पना, अफवा या मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे आदिवासी भागातील तरुण,वृद्ध,महिला कोरोनाची लस घेत नाहीत. व केवळ अज्ञानामुळे त्यांना या आजाराला बळी पडावे लागते.

सुशिलकुमार चिखले यांचं मूळ गाव याच परिसरात असल्यामुळे व तालुकास्तरावर अकोले पंचायत  समितीचे गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सातत्याने संपर्कात राहून गटातील सर्व  प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र व दुर्गम भागातील सरपंच यांच्या अडचणी समजून आपला हक्काचा माणूस म्हणून  येथील जनतेची अडचणी इत्यंभूत समजून आल्या आहेत. 

तसेच येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते या सातेवाडी जिल्हा परिषदेच्या गटातील दुर्लक्षित, दुर्गम  कुमशेत, जानेवाडी, पाचनई, पेठेचीवाडी, फोफसंडी अश्या अनेक दुर्गम गावांना भेटी देऊन आढावा घेत आहेत. ह्या गावातील त्यांच्या मित्रांच्या संपर्कात राहून त्यांचेही सहकार्य घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन करून मदतीसाठी हाथ सदैव पुढे असतो व त्यामुळे अडचणी निर्माण होउ दिल्या जात  नाहीत. येत्या महिनाखेरपर्यंत गट कोरोनामुक्त करून संपूर्ण गटात गाव तिंथे लसीकरण मोहीम राबविणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय