Saturday, September 28, 2024
Homeजिल्हाSatara : इंदोली येथे नृसिंह ग्रामदेवतेच्या यात्रेत भाविकांची गर्दी

Satara : इंदोली येथे नृसिंह ग्रामदेवतेच्या यात्रेत भाविकांची गर्दी

इंदोली : सातारा जिल्ह्यातील इंदोली ग्रामदैवत नृसिंह जयंती दिवशी जन्मकाळ निमित्त मोठी यात्रा भरली होती. त्या आधी एक आठवडा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.

भगवान नृसिंह हा जगाचा निर्माता भगवान विष्णूचा चौथा अवतार आहे. हिरण्यकशपूला मारण्यासाठी आणि भक्त प्रल्हादचे रक्षण करण्यासाठी तो अवतरला होता. त्यामुळे दरवर्षी वैशाख मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला नृसिंह जयंती साजरी केली जाते. satara news


दि. इंदोली ग्रामदैवत नृसिंह मंदिर येथे २१ मे रोजी जन्म सोहळ्यानंतर अभिषेक करण्यात आला, पुरोहितांनी पहाटे पासून दिवसभर दंडवत देवदर्शन पुरणपोळीचा नैवेद्य पुजन केले. तोरण बांधले गेले. यावेळी भजनी मंडळाचे वतीने वारकरी अभंगाचे सादरीकरण किरण भोसले यांच्या टीमने केले. INDOLI

संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक, लक्षवेधी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नृसिंह जयंतीला इंदोली गावातील शेकडो भाविक महिलांनी नवसाचे तोरण बांधले.
जन्म सोहोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी छबिना मिरवणूक मंदिरातून संपूर्ण इंदोली गावातून निघाली. यावेळी पुणे, मुंबई, ठाणे येथील चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी यात्रेत पालखीच्या दर्शनासाठी सामील झाले होते.

इंदोली ग्रामस्थ परिवार यांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय