Saturday, April 27, 2024
Homeजुन्नरआजी-आजोबा नावाची संस्कार शाळा दूर जात आहे, त्यांना जपा – जितेंद्र बिडवई 

आजी-आजोबा नावाची संस्कार शाळा दूर जात आहे, त्यांना जपा – जितेंद्र बिडवई 

जुन्नर / आनंद कांबळे : कुटुंबातील ज्येष्ठांना आदर व सन्मानाने वागवा, त्यांना या वयात प्रेम, आपुलकी चा आधार द्या. परंतु स्पर्धा व धावपळीच्या युगात कुटुंबातील आजी-आजोबा नावाची संस्कार ची शाळा नष्ट होत आहे, त्यांना जपणं खूप गरजेचे आहे,नाहीतर भविष्यात तरुण पिढी संस्कारहीन पाहावयास मिळेल असे मार्गदर्शन करताना  काठी वाटप कार्यक्रमात जितेंद्र बिडवई यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र वडज ता. जुन्नर येथे डिसेंट फाऊंडेशन या सामाजिक शैक्षणिक, कृषी व आरोग्य विषयक उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून “एक काठी आधाराची” या उपक्रमांतर्गत आजी – आजोबांना आधार काठी वाटप कार्यक्रमात लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई बोलत होते.

डिसेंट फाउंडेशनचे सामाजिक, कृषी, व आरोग्य विषयक उपक्रम समाजातील सर्व घटकांसाठी अत्यंत उपयोगी आहेत.कोणतीही शासकीय मदत न घेता,समाज हिताची कामे करीत आहेत.विशेष म्हणजे संस्थेचा किशोरवयीन मुली, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक, शारीरिक आरोग्य हा उपक्रम शाळा- शाळांमधून राबवला जातो, तो निश्चितच गौरवस्पद आहे.

– सुनिल चव्हाण, सरपंच, तीर्थक्षेत्र वडज 

या कार्यक्रमात वडज, सुभाषवाडी, नंदनवाडी, विठ्ठलवाडी येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आधार काठीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, वडज चे सरपंच सुनिल चव्हाण, प्रकल्प समन्वयक फकीर आतार , विठ्ठलवाडी चे सरपंच आदिनाथ चव्हाण, माजी उपसरपंच अजित चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या नंदा चव्हाण, अमोल चव्हाण, संघाच्या बचत गटाचे अध्यक्ष सोपान शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या संचालिका चंद्रभागा चव्हाण,मंगेश चव्हाण, अविनाश चव्हाण, आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एफ.बी.आतार यांनी तर सूत्रसंचालन मंगेश चव्हाण व अविनाश चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय