Home पुणे - पिंपरी चिंचवड Sanjog Waghere : कामशेत येथे शनिवारी महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता विशेष बैठक

Sanjog Waghere : कामशेत येथे शनिवारी महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता विशेष बैठक

Sanjog Waghere: Mahavikas Aghadi office bearers special meeting at Kamshet on Saturday

कामशेत : आगामी लोकसेवा निवडणूक तोंडावर आली असता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये शिवसेना पक्षांमधील तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करणारे सर्व पदाधिकारी तसेच सर्व आघाड्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर बैठक मावळ कामशेत येथे आयोजित केली आहे. कामशेत येथील गणेश मंगल कार्यालयात 16 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे.(Sanjog Waghere)

शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघिरे पाटील, लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख, मा.आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार, महिला संपर्क संघटिका लतिकाताई पाष्ट्ये, तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख महिला आघाडी शादान चौधरी, पुणे जिल्हा संघटीका शैला खंडागळे, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका संघटीका अनिताताई गोंते, युवासेना तालुका अधिकारी ऊमेश गावडे, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.(Sanjog Waghere)

तसेच मावळ तालुक्यातील सर्व शहरप्रमुख व प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेना युवासेना, महिला आघाडी, आजी-माजी नगरसेवक, सर्व अंगीकृत संघटना, म्हणजेच “महाविकास आघाडी” पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीस बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका चे आशिष ठोंबरे यांनी केली आहे.(Sanjog Waghere)

Exit mobile version