Home जुन्नर जुन्नर : ‘मी तुमच्या मुलाचा मित्र आहे’ असे सांगून भरदिवसा चोरी

जुन्नर : ‘मी तुमच्या मुलाचा मित्र आहे’ असे सांगून भरदिवसा चोरी

Junnar Theft of 75 thousand gold in broad daylight from Shinde farm in Belhe saying I am your son's friend

Junnar : बेल्हे येथील शिंदे मळ्यात मंगळवार दि. १२ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने घरात शिरून सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली. यामध्ये एकूण ७५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. Junnar Theft of 75 thousand gold

सविस्तर वृत्त असे की, शिंदे मळ्यातील पार्वती रामदास शिंदे (वय. ६२) या घरामध्ये असताना तुमचा मुलगा निलेश शिंदे हा माझा मित्र असून त्याचे आधार कार्ड घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून कपाटात उचका पाचक करून कपतील १ तोल्याची सोन्याची चैन (अंदाजे ५० हजार रुपये रकमेची), कानातील सोन्याचे ५ ग्रामचे डूले (अंदाजे २५ हजार रुपये रकमेचे) असा एकूण ७५ हजार रुपये रकमेचा ऐवज चोरी गेला आहे. अशी फिर्याद पार्वती शिंदे यांनी आळेफाटा पोलिसात केली आहे. (junnar)

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे पती झोपलेले होते. त्यावेळी एक एसम (नाव पत्ता माहीत नाही) हा त्याच्याकडे असलेले मोटार सायकल (तेचे नाव व नंबर माहीत नाही) ही घेऊन घरच्या अंगणात येऊन उभी करून तो इसम आमच्या घरात आल्यावर मी विचारले की तुम्हाला कोण पाहिजे तो इसम म्हणाला की, मी तुमचा मुलगा निलेश याचा मित्र असून मी निलेश शिंदे याला ओळखतो. (junnar)

निलेश शिंदे यांची पत्नी निकिता हिचे माहेर बेल्हे येथे आहे. तुमचा मुलगा निलेश हा निघोज येथे पतपेढीत कामाला आहे. मला त्याने आधार कार्ड आणण्यास सांगितले आहे. तेंव्हा मी त्याला सांगितले आधारकार्ड कपाटात आहे असे सांगितले. तेंव्हा त्या इसमाने मला पाणी आणण्यास सांगितले. आणि मी घरात पाणी आणायला गेले. यावेळी त्या इसमाने कपाटात उचका पाचक करू कपात उघडत होता. मी पाणी घेऊन आल्यावर मला निलेशचे आधार कार्ड सापडले असून मी ते घेऊन जात आहे. तो घरातून निघून गेल्यानंतर मी कपाटाचे ड्रावर पहिले असतात त्यात ब्राऊन रंगाचे पाकीट नव्हते.

त्या पाकीट मध्ये माझा मुलगा निलेश याने १ तोळा सोन्याची चैन, त्याची पत्नी माझी सून निकीता हिचे ५ ग्राम सोन्याचे डूले कानातले नव्हते. एकूण ७५ हजार रूपये किमतीचे सोन्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिसात करत आहेत.

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

Exit mobile version