Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : तृतीय पंथीयाना मिळणार मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व लायसन्स

PCMC : तृतीय पंथीयाना मिळणार मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व लायसन्स

PCMC : Free driving training and license for trigenders class

महिला दिनानिमित्त तृतीय पंथीयासाठी शहरातील पहिलाच उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१५ -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या चिटणीस आणि वाल्हेकर वाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या  पल्लवी मारकड यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला भगिनींसाठी सवलतीच्या दरात  ड्रायव्हिंग लायसन व  वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची सुविधा दि.१४ मार्च पासून सुरू करण्यात आली. PCMC

तृतीयपंथीयांना प्रथमच प्राधान्यक्रम देणारा उपक्रम

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या चिटणीस आणि वाल्हेकर वाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी मारकड यांनी इतर महीला समवेत शहरातील नोंदणीकृत तृतीयपंथीयांना प्रथमच ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी प्रेरणा देण्याचा शहरातील प्रथम उपक्रम राबवला आहे.

सदरचे प्रशिक्षण नाव नोंदणी केलेल्या महिला भगिनींनाच उपलब्ध असणार असून चिंतामणी गणेश मंदिराजवळ हे प्रशिक्षण होणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी  भाजपा महिला मोर्चा पिंपरी चिंचवड च्या अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेविका करुणा चिंचवडे, भारतीय स्त्री शक्तीच्या प्रमुख निवेदिता ताई कछवा, प्रदेश महाराष्ट्र पश्चिम सचिव सौं कविता हिंगे, सुरभी ड्रायव्हिंग क्लासेसच्या संचालिका नीता कुशारे, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष दिपाली कलापुरे,महिला मोर्चा सरचिटणीस अनघा  रुद्र, महिला मोर्चा चिटणीस पल्लवी पाठक, विद्या चिंचवडे, आदी मान्यवर उपस्थित होत्या. PCMC

यावेळी सुजाता पालांडे यांनी मनोगत व्यक्त करताना सदरच्या प्रशिक्षणात नोंदणीकृत तृतीयपंथी बांधवाना आपण हे प्रशिक्षण मोफत देणार असून त्याचा परिसरातील तृतीय पंथी यांनी लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचण्यासाठी भाजपा  कटिबद्ध आहे.

नगरसेविका करुणा चिंचवडे म्हणाल्या की, “महिलांना सक्षम करण्यासाठी खूप छान उपक्रम राबवला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे.

या उपक्रमात ४० महिलांना फोरविलर ड्रायविंग प्रशिक्षण देणार असून लर्निंग लायसन फ्री मिळणार आहे. हा उपक्रम प्रशिक्षण १६ दिवसाचे असणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका पल्लवी मारकड यांनी केले व आभार  विद्या चिंचवडे यांनी मानले.

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

Exit mobile version