पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महिला सबलीकरण व उन्नती साठी भाजपा महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विविध उपक्रम शहराध्यक्ष शंकर जगताप व महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात. PCMC
पिंपरी चिंचवड (PCMC) शहरात नोकरदार महिला, विद्यार्थिनी यांचे मोठे प्रमाण आहे. “फोर व्हीलर ड्रायव्हिंग हे आत्मविश्वास वाढवणारे कौशल्य आहे, फोर व्हीलर ड्रायव्हिंग मध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे, महिलांनी फोर व्हीलर ड्रायव्हिंग शिकावे” – यासाठी भाजप महिला मोर्चा सचिव पल्लवी पाठक, महीला मोर्चा उपाध्यक्ष दीपाली कलापुरे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून सुरभी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका व भाजप महिला उद्योग आघाडी राज्य उपाध्यक्षनिता कुशारे यांच्या सहकार्याने माफक दरात फोर व्हीलर ड्रायव्हिंग क्लासेस सुरू केले आहेत.
या क्लासेसचा शुभारंभ कार्यक्रम माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सोना गडदे सरचिटणीस ओबीसी तसेच महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी शहरातील बहुतांश महिलांनी यामध्ये नोंदणी केलेली आहे.असे पल्लवी पाठक यांनी सांगितले.
हे ही वाचा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले
Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात
ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा
सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट