पैठण – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँँसाहेबांच्या पैठण शहरातील स्मारकासाठी नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा योजने अंतर्गत ८० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पत्रद्वारे दिली.
सदर जिजाऊ स्मारकाची उभारणी नगर परिषद मार्फत करण्यात येणार असून नुकतीच काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी याबाबत प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. जिजाऊ माँँसाहेबांच्या स्मारकासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्याबाबत शिवसेना नगरसेवक तुषार पाटील व शिवसेना नगरसेविका श्रीमती संगीता मापारी, कृष्णा मापारी यांनी विद्यमान रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री व तत्कालीन आमदार संदीपान भुमरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने मंत्री संदीपान भुमरे यांनी नागरी दलितेतर विकास योजने अंतर्गत ८० लक्ष रुपये निधी मंजूर करून जिजाऊ स्मारकासाठी आवश्यक असलेली साडे आठ गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे मंजूर ८० लक्ष रुपये निधीतून भव्य स्मारक स्टेज चौथरा, संरक्षक भिंत, पेवर ब्लॉक, स्वागत कमान, गार्डनिंग, विद्युतरोषणाई आदी कामे केली जाणार असल्याचे शिवसेना नगरसेवक तुषार पाटील व कृष्णा मापारी यांनी सांगितले.
शब्द पाळणारा नेता… संदिपान भूमरे
पैठण शहरात राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे स्मारक व्हावे यासाठी आम्ही गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रयत्न करत होतो सदर कामांमध्ये आम्हाला अनेकानेक अडचणी निर्माण होत होत्या त्या निर्माण होणाऱ्या अडचणीच्या दृष्टीने आम्ही विद्यमान मंत्री व तत्कालीन आमदार संदिपान भुमरे यांची नगरसेवक तुषार पाटील, कृष्णा मापारी व इतर शिवप्रेमींनी भेट घेऊन जिजाऊ स्मारक कामा संदर्भात माहिती दिली आणि साहेबांना विनंती केली की राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मारक आपल्याला पैठण शहरात निर्माण करायचे आहे.
हे स्मारक करत असताना नियोजित जिजाऊ चौकातील जागा स्मारकासाठी अपुरी पडत आहे. त्याअनुषंगाने भव्य स्मारकासाठी जागा उपलब्ध होत नाहीये आपण स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, असे साकडे आम्ही शिवप्रेमींनी भूमरेंंनी घातले. त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता की जिजाऊ मातेचे कार्य फार मोठे आहे. त्यांनी महाराष्ट्राला एक नव्हे दोन छत्रपती दिले आहेत त्यांच्या स्मारकासाठी जागाच काय निधी पण उपलब्ध करून देतो आणि आज खऱ्या अर्थाने भुमरे यांनी शिवप्रेमी जनतेला दिलेला शब्द खरा करत जिजाऊ मातेच्या स्मारक कामासाठी लागणारा ८० लक्ष रुपये निधी व स्वतः संस्थापक असलेल्या खरेदी-विक्री संघाच्या मालकीची साडे आठ गुंठे जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांचे पैठण शहर व तालुक्याच्या शिवप्रेमी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे शिवप्रेमी नगरसेवक तुषार पाटील व कृष्णा मापारी यांनी सांगितले.