Friday, November 22, 2024
HomeNewsकचरा वर्गीकरणासाठी निवासी घरांना सेवाशुल्क आकारु नये---अण्णा जोगदंड .

कचरा वर्गीकरणासाठी निवासी घरांना सेवाशुल्क आकारु नये—अण्णा जोगदंड .

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मनपा म्हणून नावलौकिक होता आणि या औद्योगिक नगरीत उदरनिर्वासाठी महाराष्ट्रासह, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला कामगार वर्ग स्थायिक झाला आहे. एक तर पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच आस्थापनेत मंदीचे सावट कामगारावर आहे,आणि दोन वर्षे झाली आहेत नागरिकांचे कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आता कुठेतरी जनजीवन पूर्व पदावर येत असतानाच अशाच काळात कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली सेवाशुल्क 60 रुपयापासून ते 2000 रुपये पर्यंत प्रती महिना वाढवण्याचा प्रशासक शेखर सिंह यांनी निर्णय घेतला आहे. यामध्ये वैयक्तिक कुटुंबे, गृहनिर्माण संस्था, रुग्णालय, कार्यालय, धार्मिक संस्था, उपाहारगृहे, यांच्यासह ज्या ज्या ठिकाणी वर्गिकृत कचरा निर्माण होणाऱ्या वर मनपा सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे.सेवाशुल्क मनपाच्या कर आकारणी  वार्षिक बिलातून वसूल करण्यात येणार आहे, प्रत्येक निवासी घरासाठी वार्षिक 720 तर काही ठराविक व्यवसायिकासाठी वार्षिक 24000 रुपये पर्यंत कचरा सेवाशुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे.

सध्या पालिकेवर कोणत्याही राजकीय पक्षाचे वर्चस्व नसल्यामुळे कोणीही राजकीय पदाधिकारी विरोध करताना दिसत नाहीत.प्रशासक शेखर सिंह यांनी कमीत कमी निवासी घरासाठी सेवा शुल्क आकारु  नये अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी निवेदनातून प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे .

यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले कि, मिळकत कराच्या बीलामध्ये सर्व प्रकारचे कर समाविष्ट केलेले असतांना हा वर्गीकृत कचऱ्यासाठी सेवा शुल्क वेगळा का? पाठवलेल्या निवेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर ,शहराध्यक्ष अण्णा जोगदंड ,कार्याध्यक्ष मुरलीर दळवी, सचिव ,गजानन धाराशीवकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड,शहर महीला अध्यक्षा.मीना करंजावणे यांच्या सहया आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय