Friday, May 10, 2024
Homeराज्यभारताचा पहिला रेडिओ टेलिस्कोप बनवणारे कोल्हापूरचे अवकाश शास्त्रज्ञ डॉ.आर व्ही.भोसले.

भारताचा पहिला रेडिओ टेलिस्कोप बनवणारे कोल्हापूरचे अवकाश शास्त्रज्ञ डॉ.आर व्ही.भोसले.

       डॉक्टर राजाराम विष्णू भोसले फार मोठे अवकाश शास्त्रज्ञ.  यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी  आजोळी  झाला अनेकांना माहीत नाही की सोनाळी मध्ये तीन चार आळींचे छोटेसे  खेडे माझ्या या खेड्यांमध्ये जन्मलेला हा शास्त्रज्ञ पदापर्यंत  पोहचला. ते त्यांचे  यश जर आपण बघितले तर ती फार अभिमान बाळगणारी गोष्ट आहे.

              कागल तालुक्यातील बस्तवडे हे त्यांचे मूळ गाव त्यांची आई ईश्वर भक्त होत्या पाटीलकी त्यांच्या घराण्यात नांदत आलेली. भोसले पाटील घराण्यात जन्मलेला हा मुलगा आंतरराष्ट्रीय खगोल, अवकाश शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आला त्यांचे तीन बंधू सखाराम, तुकाराम, पांडुरंग .त्यांच्या शिक्षणाचा सर्व भार त्यांच्या थोरल्या बंधूंनी पांडुरंग यांनी केला होता. त्यांचे शिक्षण कोल्हापूरला नागोजीराव पाटणकर हायस्कूल नंतर राजाराम महाविद्यालय तिथून पुणे आणि मग उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला रवाना झाले.

               अहमदाबादला डॉक्टर विक्रम साराभाई यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केली होती.  डॉ. प्रा. के. आर. रामनाथन यांना तेथे संचालक म्हणून घेतले होते. ते डॉ. सी. व्ही. रामन यांचे पहिले विद्यार्थी आणि रामन इफेक्टचे संशोधन कार्यात डॉ. रामनाथन यांनी सहकार्य केले होते ते डॉ. आर.वी .भोसले यांचे गुरु.

               पीएचडीचा अभ्यास करताना डॉक्टर भोसले यांनी स्वतः रेडिओ टेलिस्कोप तयार केला आणि तो भारतातला पहिला रेडियो टेलिस्कोप ठरला.  त्याचा वापर करून आकाश गंगेतून  रेडिओ लहरींचा अभ्यास केला आणि तोच त्यांचा पीएचडीचा प्रबंध जर्मनीला पाठवण्यात आला होता. १९६१ ते पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून कॅनडाला गेले. तेथे त्यांनी सॅटॅलाइट स्टडीज ऑफ द इयर आणि गुरू ग्रहाचे रेडिएशन व पोलारिझेशन या दोन विषयावर संशोधन केले डॉ. विक्रम साराभाई व प्राध्यापक रामनाथन यांच्या आवाहनाला मान देऊन ते भारतात अहमदाबादला परत आले. तेथे जवळजवळ ते ३५ वर्षे निवृत्तीपर्यंत राहिले त्यानंतर ते शिवाजी विद्यापीठामध्ये  ईमिरिटस सायंटिस्ट म्हणून भौतिक शास्त्र विभागाला काम करत होते. त्यांचे परदेशागमन म्हणजे पूर्ण शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते ते सधन कुटुंबातील नव्हते किंवा त्यांच्या मागे कोणीही मातब्बर मंडळी उभा नव्हती. पण कोल्हापूरची त्यांची असलेली आपुलकीने जवळ म्हणून त्यांनी पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्र येथे सुरू केले. वीस वर्षे ते चिकाटीने शासनाच्या मागे लागले होते आणि त्यांनी ते पूर्णत्वास नेले.

                शिवाजी विद्यापीठात होते; त्यावेळी अमेरिकेतली मुरी ड्रायर सारखे शास्त्रज्ञ विद्यापीठमध्ये आले होते. अहमदाबाद आणि तिरुपतीहून सुद्धा त्यांनी काही महत्त्वाची साधने शिवाजी विद्यापीठ मध्ये आणलेली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राबद्दल अभ्यास करता यावा. तसेच या क्षेत्रात त्यांना संशोधन करून पीएचडी मिळवावी म्हणून १९९० साली त्यांनी अवकाशशास्त्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यावेळी मला आठवण आहे डॉ. भोसले हे माझे नातेवाईक त्यामुळे ते काय करणार आहेत. शिवाजी विद्यापीठामध्ये याची मला कल्पना दिली होती आणि त्यामुळे मी त्या वेळेला दैनिक सकाळ कोल्हापूर मध्ये अनंत दीक्षित संपादक होते. त्यांना मी विनंती केली की बी.एस.सी.चा निकाल लागेल त्याच दिवशी डॉ.भोसले यांची घेतलेली मुलाखत आपण प्रसिद्ध करा. त्यामुळे ती प्रसिद्ध करताच या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिवाजी विद्यापीठात आठ ते नऊ लोकांनी नाव नोंदले आणि विभाग सुरू झाला. त्यामध्ये नंतर एका मुलीने पीएचडी सुद्धा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती त्यांचे फार मोठे योगदान होते. 

                ज्ञानार्जनासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला ते योग्य ते मार्गदर्शन करीत असत आणि त्यांच्यामुळे त्यावेळेला डॉक्टर अब्दुल एपीजे कलाम आले किंवा मोठमोठे शास्त्रज्ञ शिवाजी विद्यापीठामध्ये त्या वेळी आवर्जून ते डॉक्टर भोसले यांची भेट घेत असत त्यांनी डॉक्टर भटनागर यांच्या सहकार्याने उदयपूरला सौर वेधशाळा सुद्धा त्यांनी स्थापन केलेली होती.

               त्यांनी मला एक पत्र दाखवलं की मंगळावरचे अमेरिकेचे नासाच्या संशोधन होतं. त्याच्या मध्येत्यांचा सहभागी नासा’ने घ्यायचं मान्य केलं होतं त्यांची निवड त्यासाठी झालेली होती. डॉ. भोसले हे मनाने अतिशय निर्मळ, शांत प्रवृत्तीचे होते. महांगावकर कॉम्प्लेक्समध्ये ग्राउंड फ्लोअरला ते राहत असत आणि कोल्हापूरला आल्यानंतर मी त्यात काळामध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला होता. पण मला डॉ. भोसले आल्यानंतर खूप आनंद कशासाठी झाला की माझ्या पुस्तकांमधली शास्त्रीय चुका होत्या. त्यांनी सगळ्या दुरुस्त केल्या आणि त्यामुळे मी ते पुस्तक त्यानाच अर्पण केलेले आहे.  त्याच्या तीन आवृत्ती निघाल्या आणि आपल्या कोल्हापूर प्रेस क्लब आणि सिंहवाणी प्रकाशन’तर्फे पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम करवीर वाचन मंदिर मध्ये ठेवला होता आणि डॉ. भोसले यांच्यामुळे इस्रोचे डायरेक्टर आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. एकनाथ चिटणीस कार्यक्रमाला आले आणि त्यांनी त्या पुस्तकावर भरभरून स्तुती करणारा  अभिप्राय राहिला आणि कार्यक्रमाला ते खास उपस्थित राहिले. 

            डॉ. भोसले यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पेसमेकर बसला होता आणि मध्यंतरी ते पडल्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. पण त्यांच्या दोन मुली त्यांच्या सुविद्य पत्नी यानी त्यांची   घेतलेल्या काळजीमुळे इतके वर्ष भोसले साहेब जगू शकले आणि त्याचा लाभ सगळ्या कोल्हापूरला झाला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले, पण शासनाचे या शास्त्रज्ञांकडे पद्मश्री ,पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात साफ दुर्लक्ष झालेले आहे. त्यांच्याबद्दल आमच्या कोल्हापूरच्या राजकीय पुढाऱ्यांना जाण होती ना एज्युकेशन लेव्हलवर त्यासाठी आग्रह केला गेला. 

            शांत वृत्तीच्या डॉ. भोसले यांच्याबरोबर मागे एक वेळ मी दक्षिण भारताचा प्रवास केला होता. त्यावेळेला पोंडीचेरीमध्ये आम्ही असताना डॉ. आरवी भोसले बोटॅनिकल गार्डनमध्ये फिरताना मला एक दगडात रूपांतर झालेला मोठा लाकडाचा ओंडका दाखवला आणि त्यांनी समजून सांगितलं की याचे कार्बन कण आणि दगडाचे कार्बन  कणकसे ट्रान्सफर होतात आणि लाकडाचे रूपांतर दगडांमध्ये होतं तुम्ही त्यांच्या बरोबर कोठेही असा त्यांच्या ज्ञानाचा कारंजा सततच प्रगट होत असे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. सुभाष देसाई

ज्येष्ठ विचारवंत, कोल्हापूर 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय