Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरेड झोन प्रश्नासंदर्भात पाठपुरावा केला जाईल – डॉ. निलमताई गोऱ्हे

रेड झोन प्रश्नासंदर्भात पाठपुरावा केला जाईल – डॉ. निलमताई गोऱ्हे

आळंदी / अर्जुन मेदनकर : पंढरपूर प्रमाणे तीर्थक्षेत्र आळंदी, पंचक्रोशी, खेड तालुक्यासह पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात शास्वत विकासासाठी नदी प्रदूषण दूर होणे आवश्यक आहे. येथील शाश्वत विकास कामांसाठी तसेच च-होली, दिघी आणि भोसरी रेड झोन प्रश्ना संदर्भा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे आळंदीत खाजगी कार्यक्रमास असताना आळंदी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्ते आणि पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या प्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. रामशेठ गावडे, पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख कुणाल तापकीर, आळंदी शिवसेना विभाग प्रमुख सुरेशनाना झोंबाडे, शशिकांतराजे जाधव, पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख कुणाल तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल उपाध्यक्ष गणेश ताजणे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकारी यांचे माध्यामातून पर्यायी सर्व समावेशक विकास आराखड्याचा प्रस्ताव दिल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल. शिवसेना पदाधिकारी यांनी पर्यायी विकास आराखडा तयार करून सादर करावा. यामध्ये आळंदी पंचक्रोशी तसेच परिसरातील २० ते २५ गावे, पिंपरी चिंचवड महापालिका येथील विकास कामांचा यात समावेश व्हावा. पर्यायी विकास आराखड्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिल्या.

आळंदीचाच नाही तर इतर तीर्थक्षेत्र भीमाशंकर, सिद्धेश्वर विकास कामांचा समावेश करण्याची त्यांनी आठवण करून दिली. पिंपरी चिंचवड महापालिका, आळंदीसह लगतची इतर २० ते २५ गावातील गरजे नुसार विकास कामे यांचा विचार करून प्रस्ताव द्या.
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असताना लक्ष देण्यात आले. आता मात्र मध्येच सरकार बदलले आणि प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. पंढरपूर विकास कामास सुरुवात झाली. त्याच प्रमाणे अधिकचा आळंदी पंचक्रोशीचा विकास केला जाईल. भक्त निवास आणि पर्यटनाचे दृष्टीने भाविकांसाठी विरंगुळा केंद्र विकसित केल्यास भाविकांना सेवा सुविधा मिळतील. यासाठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले. येत्या नागपूर येथील अधिवेधनात यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

खेड तालुक्याचा पर्यायी विकास आराखडा सादर करा,अशा सूचना त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या. करण्याच्या सूचना शिवसेना पदाधिकारी यांना दिल्या. आळंदीतील कार्यकर्ते संपर्कात असतात.

रेडझोनचे प्रश्न मार्गी लावणार


पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख कुणाल तापकीर यांनी च-होली, दिघी आणि भोसरी रेड झोन प्रश्ना संदर्भा उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. चऱ्होली बुद्रुक व इतर समाविष्ट गावे १९९७ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाली आणि २००२ मध्ये विकास आराखडा मंजूर करण्यात आला. सुमारे २० वर्षांनी महानगरपालिकेचा विकास आराखडा पुनर्रचना करण्यात येतो. २०२२ – २३ विकास आराखडा पुनर्रचना करत असताना रेड झोनची हद्द सुस्पष्ट व कायम स्वरूपी दर्शविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रेड झोन हद्द कायम नसल्यामुळे बाधित भूमिपुत्रांना रेड झोन लगतचे क्षेत्र विकसित करण्यास अडचण असल्याची बाब यावेळी लक्षांत आणून देण्यात आली. रेड झोनचा नकाशा प्रसिद्ध नसल्याने रेड झोनच्या नावा खाली कमी दरात एजंट जागा शेतकऱ्याकडून खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि त्या जागा रेसिडेन्शिअल झोन असल्याचे दाखवून सर्वसामान्य नागरिकांना विकण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला असल्याचे तापकीर यांनी यावेळी सांगितले. या जागेवर सर्वसामान्य नागरिकांनी घरी बांधल्यानंतर महानगरपालिकेच्या सोयी सुविधा का मिळत नाही याचा पाठपुरावा केला असता महापालिकेकडून रेड झोनचे कारण सांगून सोयी सुविधा देण्यास नकार देण्यात येत असल्याचे यावेळी तापकीर यांनी निदर्शनास आणून दिले.

विविध प्रश्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रेड झोनची हद्द निश्चित केल्यानंतर सुटणार असल्याने यासाठी मदत व सहकार्य करण्याची मागणी करीत डॉ. निलमताई गोऱ्हे यांचेकडे साकडे घालण्यात आले. यावेळी त्यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास सांगून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये सदरचा प्रश्न उपस्थित करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे आदींनी भाग घेत विकास कामे मार्गी लावण्यास पाठपुरावा करण्यासाठी माहिती दिली. तत्पूर्वी आळंदी नागपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी ही उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांचेशी संवाद साधला.

Lic
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय