Wednesday, January 15, 2025
Homeराज्य"हनुमानाचं नाव कसं पडलं" राणा दाम्पत्यांची पंचाईत, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

“हनुमानाचं नाव कसं पडलं” राणा दाम्पत्यांची पंचाईत, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात हनुमान चालीसेचा मुद्दा गाजत आहे. अशातच आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून राणा दाम्पत्यांना ट्रोल केले जात आहे.

नुकतीच राणा दाम्पत्याने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नवनीत राणा यांना एक प्रश्न विचारला कि, तुम्ही हनुमानाचे एवढे भक्त आहात, मग हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं?, हे सांगा. या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, त्यामुळे त्यांची तारांबळ उडाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.

भाजप धर्मांधतेच्या अडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे ! – डॉ. अशोक ढवळे

 

जिल्हा निवड समिती, गोंदिया अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरती, 24 मे 2022 शेवटची तारीख

हा प्रश्न विचारल्यानंतर नवनीत राणा यांनी रवी राणा यांच्याकडे पाहिले त्यांनीही मान खाली घातली. अखेर सावरासावर करत तुम्ही आता इतिहासात नेणार असाल तर आम्ही माहिती घेऊ. इतिहास पुन्हा वाचू. मी हनुमान चालीसा वाचते, त्याविषयी नक्की बोलेन, असं उत्तर नवनीत राणा यांनी दिले. मात्र या प्रश्नावर नवनीत राणांना काय उत्तर द्यावे, हे सुचत नसल्याचे व्हिडीओ मध्ये दिसते आहे. 

या व्हिडीओवरून राणा दाम्पत्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी यावरून नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. ‘हनुमान चालीसा हातात धरून नाटके करणारी ही हिंदी चित्रपटातील दुय्यम प्रतीची अभिनेत्री, हिला हनुमान हे नाव कसे प्रचलित झाले, याची माहिती नाही आणि अक्कल शिकवायला निघाली, असं ट्विट कायंदे यांनी केलं आहे.

निरा – भिमा सहकारी साखर कारखाना, इंदापूर (पुणे) येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 31000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख

लोकप्रिय