– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महापालिकेतीलच अनुभवी अधिकाऱ्याला पदोन्नती द्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
भाजप धर्मांधतेच्या अडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे ! – डॉ. अशोक ढवळे
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. विकासाचे सारथी असलेले हे अधिकाऱ्यांप्रति माझ्यासह तमात पिंपरी-चिंचवडकरांच्या मनामध्ये कृतज्ञता भाव आहे. महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील आता सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी महापालिकेतच सेवा बजावलेल्या अनुभवी अधिकाऱ्याला पदोन्नती द्यावी. यापूर्वीही शहर अभियंतापदी महापलिकेतील अधिकाऱ्याला पदोन्नती देण्यात आली होती, तीच परंपरा आता नवीन शहर अभियंत्याबाबतील लागू करण्यात यावी. शहर अभियंतापदी राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, महापालिकेत काम केलेल्या अनुभवी व्यक्तीची या पदावर नियुक्ती केल्यास निश्चितपणे विकासकामांत मदतच होणार आहे.
तसेच, अनेक वर्षे महापालिकेत काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचाही एकप्रकारे सन्मानच होणार आहे. श्री. पाटील यांच्या जागी महापालिकेत सेवा बजावलेला अनुभवी अधिकारी नियुक्त करावा, या मागणी माझ्यासह सर्वपक्षीय नेत्यांचेही समर्थन असेल. कारण, शहरात काम केलेला अधिकारीच शहराच्या समस्या समजू शकतो, अशी आमची भावना आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर