Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनावर औषध सापडल्याचा रामदेव बाबांचा दावा, आयुष मंत्रालयानं गंभीर दखल घेत पाठवली...

कोरोनावर औषध सापडल्याचा रामदेव बाबांचा दावा, आयुष मंत्रालयानं गंभीर दखल घेत पाठवली नोटीस; ट्विटरवर “सलवारी बाबा झूठा है” ट्रेंड सुरु

(महाराष्ट्र जनभूमी):- रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर कोरोनिल, श्वासारी ही आयुर्वेदीक औषधं शोधल्याचा दावा (23 जून) पत्रकार परिषेदत केला. या दोन्ही गोळ्या असून यामुळे कोरोनाचे रुग्ण सात दिवसांत बरे होतील, असा दावा रामदेव बाबा यांनी यावेळी केला.

       दरम्यान, रामदेव बाबांनी कोरोनावर औषधं शोधल्याचा हा दावा केल्यानंतर आयुष मंत्रालयानं त्याची गंभीररित्या दखल घेतली आहे. या औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. अशाप्रकारची औषधं शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात करणं हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीरात) 1954 या कायद्याचा भंग आहे. तसंच, कोव्हिड-19 उद्रेकानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांचाही यातून भंग करण्यात आल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.

      औषधांच्या निर्मितीचा दावा करणाऱ्या कंपनीला याबद्दल सूचित करण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तसंच, संबंधित औषधांचं संशोधन कार्य तपासण्याबद्दल कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीकडून या औषधांची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचं संशोधन, किती रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, CTRI ने याची काय नोंद केली आणि कोणत्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले यासंबंधीची सगळी माहिती आयुष मंत्रायाने मागविली आहे.

    आयुष मंत्रालयाच्या नोटीसवर पतंजलीने आपली भूमिका मांडली आहे, आचार्य बालकृष्ण यांनी ट्वीट केले आहे की, ‘हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारं आहे. जो काही कम्युनिकेशन गॅप होता, तो दूर झाला आहे. कंट्रोल क्लिनिकल ट्रायलचे जे काही निष्कर्ष आहेत, ते 100 टक्के पूर्ण केले आहेत. त्यासंबंधीची सर्व माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे.

ट्विटरवर “सलवारी बाबा झूठा है” ट्रेंड सुरु

      यश मेघवाल यांनी म्हंटले आहे की, “मित्रांनो, काल भोळ्या देशवासियांना बेवकुफ बनवले होते, आणि मीडियाने सुद्धा खोट्याला साथ दिली होती, मी म्हणतो सलवारी बाबा खोटा आहे, आणि तुम्ही?

लोकेश मीना यांनी म्हंटले आहे की, योगाला व्यवसाय करून आयुर्वेदाच्या नावावर कोट्यावधी रुपयेचा व्यापार करणाऱ्या बनावट बाबा आजपर्यंत बनावट मार्गाने देशातील जनतेची लूट करीत असल्याचा संशय असल्याने, आज आयुष मंत्रालयाने बंदी घातलेल्या कोरोनाचे बनावट औषध त्यांनी आज बनवले. सलवारी बाबा खोटा आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय