Saturday, May 18, 2024
HomeNewsराखी सावंत ला बनायचे आहे मुख्यमंत्री पद मिळाल्यावर करणार "ही "कामे .!

राखी सावंत ला बनायचे आहे मुख्यमंत्री पद मिळाल्यावर करणार “ही “कामे .!

हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत ती सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळवत असते.त्याचप्रमाणे ती वरचेवर करत असलेली विधानेही चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतेच तिने तिचे एक स्वप्न शेअर केले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर ती काय सुधारणा घडवून आणेल याबाबत तिने तिचे प्लॅन्स सांगितले आहेत.

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंतने ती मुख्यमंत्री झाली तर काय करायला आवडेल यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली, “जर मला मुख्यमंत्री बनवलं तर मी ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या गोऱ्या गालांसारखे आणि गोऱ्या कंबरेसारखे रस्ते तयार करेन. आमच्या ड्रीम गर्लसारखे मी रस्ते सुंदर बनवीन. आपल्या देशात भरपूर खड्डे आहेत. तुम्ही हे विनोदामध्ये घेऊ नका.”

“चहा बनवून मोदीजी पंतप्रधान झाले तर बसून, आडवी पडून, हसत- हसत मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही?” असा प्रश्नही तिने शेवटी उपस्थित केला. तिच्या या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय