Saturday, May 18, 2024
Homeराजकारणउत्तर प्रदेशमध्ये जंगलराज ! हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल...

उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज ! हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना ताब्यात घेत केली धक्काबुक्की

nullउत्तरप्रदेश : हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले.  यानंतर ‘उत्तर प्रदेशात जंगलराज आहे’, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे. 

जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्या माणसांना आधार देण्यासाठी आपण जातो. मात्र शोकसागरात बुडालेल्या एका कुटुंबाला भेटायला गेलो तरीही सरकार आम्हाला घाबरवतंय. एवढं घाबरु नका मुख्यमंत्री महोदय या आशयाचं ट्विट करत राहुल गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

 

 हाथरस येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तिच्यावर सफदरजंग येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पिडितेचा मृत्यू  झाल्यानंतर युपी पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार करायला लावल्याचा आरोप पिडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही बाब समजल्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही हाथरस या ठिकाणी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहचले. त्यावेळी त्यांना अडवण्यात आलं, तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिलं गेले नाही, परंतु पोलिसांनी पायी येणाऱ्या राहुल गांधी यांना रस्त्यात अडवत धक्काबुक्की केल्याचा आरोप होतो आहे. 

राहुल गांधी यांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केल्यानंतर समाजमाध्यमांंमधून रोष व्यक्त केला जात आहे. सामान्य लोकांपासून अगदी राजकारण्यांपर्यंत या घटनेचा निषेध केला जात आहे.

उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ! ज्या महात्म्याने जगाला अहिंसेचा संदेश दिला. त्या पुर्वसंध्येला अशाप्रकारची घटना घडली असून याबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष न्यायासाठी रस्त्यावर उतरत असेल, तर त्यांना असे आडवून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे का? असे प्रश्न सुध्दा समाजमाध्यमानमधून उपस्थित केले जात आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय