Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणपूर्णा : डीवायएफआय कडून सार्वजनिक वाचन कक्षाची मागणी

पूर्णा : डीवायएफआय कडून सार्वजनिक वाचन कक्षाची मागणी

पूर्णा : पूर्णा शहरातील जुन्या कत्तल खाण्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक सार्वजनिक वाचनालय निर्माण करण्याची मागणी डीवायएफआयच्या पूर्णा शाखेकडून करण्यात आली.

शहरात डोबी मोहल्ला (अशोक नगर शेजारी) येथे बऱ्याच वर्षांपूर्वी एक कत्तल खाना होता आणि मागील कित्येक वर्षे तो बंद पडून तेथील जागा तशीच पडून होती. ती जागा नगरपालिका पूर्णाच्या अखत्यारीतील आहे त्यामुळे तेथे एक सार्वजनिक वाचन कक्ष निर्माण करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ते उपयुक्त ठरेल व विविध क्षेत्रातील अधिकारी त्यातून घडतील अशी मागणी आज डीवायएफआय कडून मुख्याधिकारी पूर्णा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, जय एंगडे, पांडुरंग दुथडे आणि जाकेर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय