जुन्नर / आनंद कांबळे : भारतातील सर्वात जास्त लेणींचा तालुका म्हणुन प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील लेण्यांना रशिया देशातील पर्यटकांनी शनिवार(२९) व रविवारी(३०) भेट दिली.
रशिया येथील मारिया यांच्या सोबत वेरेनोका उत्यानस्काया, अफानसेव, लिलियाना आदी रशियन पर्यटक जुन्नरच्या लेणी पाहण्यासाठी आले होते. या पर्यटकांना सिद्धार्थ कसबे, सुदर्शन साबळे यांनी लेण्यांची माहिती दिली. या पर्यटकांनी खानापुर येथील मानमोडी डोंगरावरील तसेच शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणीस भेट दिली व तेथील विहारांत विपश्यना ध्यान साधना केली.
जुन्नर : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
जुन्नरच्या बुद्ध लेणी या दोन हजार वर्षांपूर्वीच्या असुन त्यांचा वापर बौद्ध भिक्खु हे राहण्यासाठी तसेच ध्यानधारणेसाठी करत असत, तीच परंपरा जपत या रशियन पर्यटकांनी या लेण्यांत ध्यान साधनेचा अनुभव घेतला.
मारिया यांनी सांगितले की या बुद्ध लेण्या पाहुन व येथील लेण्यांत विपश्यना करून मन प्रसन्न झाले. तसेच या लेण्यांचा इतिहास ऐकुन दोन हजार वर्षांपुर्वीचा भारत कसा होता त्याची प्रचिती आम्हाला आली. भारताचा हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर
यावेळी जुन्नरचे डॉ.अमोल पुंडे यांनी जुन्नरची ग्रामीण संस्कृती त्यांना समजाऊन सांगितली. रशियन पर्यटकां सोबत लेणी अभ्यासक मकरंद लंकेश्वर, विनोद रायकर, प्रकाश वनवे उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यात लेण्या पाहण्यासाठी अनेक विदेशातील पर्यटक येत असतात, या लेण्यांकडे जाण्यासाठी आजही व्यवस्थित मार्ग नसुन कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. जुन्नर मध्ये जागतिक पर्यटक येण्यासाठी येथील लेण्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे मत लेणी अभ्यासक मकरंद लंकेश्वर यांनी व्यक्त केले.
अखेर आदिवासी शेतमजूरांचा छळ व मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक, शेतमजूरांनी प्राणांतिक उपोषण सोडले
ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी